रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ठरलं! मराठी CID ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जबरदस्त प्रोमोने वेधलं लक्ष, उत्सुकता शिगेला

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 21, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi CID serial update date and time announced see the details

मराठी सीआयडी मालिकेची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली आहे

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी (CID) ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. या मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत ही टीम प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली. आता पुन्हा एकदा ही टीम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. इतकच नव्हे तर मराठीत ही टीम सत्याचा शोध घेण्यासाठी येणार आहे.  सोनी मराठी वाहिनीवर सीआयडी (CID) ही मालिका पुन्हा एकदा सुरु होणार आहे. अभिजीत, दया आणि एसीपी प्रद्युम्न हे पुन्हा एकदा सत्याचा शोध घेण्यासाठी येणार आहेत. (Marathi CID Serial)

९० च्या दशकातील ही गाजलेली मालिका आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्जा झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर मराठी सीआयडी (CID) मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून ही मालिका कधी सुरु होणार याची उत्सुकता लागून राहिली होती आणि ही उत्सुकता आता संपली आहे. कारण या मालिकेची नुकतीच तारीख व वेळ जाहीर करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

आणखी वाचा – “‘आई कुठे…’चं पुराण एकदाचं संपणार”, नव्या मालिकेचा प्रोमो आल्यानंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “अरुंधतीची मालिका…”

येत्या ८ नोव्हेंबर पासून शुक्रवार ते रविवार् रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीकडून या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करत तारीख व वेळ जाहीर करण्यात आली आहे. सोनी मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमो खाली “गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी येत आहे टीम सी.आय.डी. आता मराठीत!” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Appi Aamchi Collector : अमोलमुळे अप्पी-अर्जुनमध्ये जवळीक, पुन्हा बहरणार प्रेम, कायमचं एकत्र येणार का?

दरम्यान, सीआयडी (CID) सोनी टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिका आहे. मालिकेने यशस्वीपणे २० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहेत. २० वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेचा आजही मोठा चाहता वर्ग आहेत. सीआयडी (CID) हा शो विविध विक्रमांसाठीही ओळखला जातो. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही या शोची नोंद आहे. अशातच आता हा शो मराठीमध्ये येत असल्यामुळे अनेक चाहते उत्सुक आहेत.

Tags: Marathi CIDMarathi CID NewsMarathi CID SerialMarathi CID Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kapil Honrao On Trolling

"ती हिंदी भाषिक, जरा अक्कल…", करवाचौथ साजरा केला म्हणून ट्रोल करणाऱ्यांवर भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, "वीट आलाय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.