Celebrity Celebrating Karwa Chauth : देशभरात करवा चौथ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सर्वसामान्यांबरोबर अनेक सेलिब्रिटीही करवा चौथ साजरी करताना दिसल्या. परिणीती चोप्रा, कियारा अडवाणी करवा चौथसाठी दिल्लीत त्यांच्या सासरच्या घरी पोहोचल्या, तर सुनीता आहुजाने तिच्या घरी करवा चौथची पूजा आयोजित केली. रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टीपासून ते नीलम कोठारी आणि भावना पांडेपर्यंत या पूजेत सहभागी झाले होते. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतही यावेळी दिसली. सर्व नायिका नववधूंप्रमाणे सजलेल्या दिसल्या. रवीना टंडनने ऑफ-व्हाइट रंगाचे कपडे घातले होते आणि केसांमध्ये गजरा माळला होता, तर शिल्पा शेट्टीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. ती पूजा थाली घेऊन अनिल कपूर व सुनीता आहुजा यांच्या घरी पोहोचली.
यापूर्वी परिणीती चोप्राने इन्स्टाग्रामवर तिची मेहंदी दाखवली होती. तिने आपल्या हातावर पती राघव चड्ढाच्या नावाने मेहंदी लावली. तिच्या सासरचे घर दिवे व फुलांनी सजवले होते. एवढेच नाही तर परिणीतीचे सासरच्या घरी भव्य स्वागत करण्यात आले. यंदा सोनाक्षी सिन्हाचाही पहिला करवा चौथ आहे, ज्यासाठी ती खूप उत्सुक दिसली. पती झहीर इक्बाल यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिनेत्रीने करवा चौथचा उपवास ठेवला. पण नंतर झहीर इक्बालनेही तिच्यासाठी उपवास ठेवला होता हे कळल्यावर सोनाक्षी भावुक झाली.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणने केदार शिंदेंची घेतली भेट, घरी बोलवत केला विशेष पाहुणचार, दिली ‘ही’ खास भेटवस्तू
करवा चौथ साजरी करण्यासाठी सोनम कपूरही तिचे वडील अनिल कपूर यांच्या घरी गेली होती. जिथे एक भव्य कार्यक्रम आयोजित होता पण सर्वांचे लक्ष फक्त सोनमकडे होते. सोनम कपूर, मीरा कपूर, शिल्पा शेट्टी, रवीना टंडनसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावेळी हजेरी लावली. यावेळी सोनमने एथनिक साडीच्या लूकमध्ये तिच्या आधुनिक ट्विस्टसह प्रसिद्धी मिळवली.
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ. पती जॅकी भगनानी यांनीही पत्नीसाठी उपवास ठेवला. पण हा करवा चौथ रकुलसाठीही थोडा त्रासदायक होता. खरं तर, ती जिममध्ये जखमी झाली होती, डॉक्टरांनीही तिला बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे तिला करवा चौथ नीट साजरी करता आली नाही.