रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गप्पा सुरु असतानाच ओरीने रणवीर सिंहचा ओढला चष्मा, अभिनेत्याचा चेहऱ्याचा बदलला रंग, केलं असं काही की…

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 19, 2024 | 4:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Orry and Ranveer Singh video from Radhika Ambani's birthday party is going viral on social media

राधिका अंबानीच्या वाढदिवस पार्टीमधील ओरी व रणवीर सिंह यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

ओरहान अवतरमणी उर्फ ओरी हा गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारं एक नाव आहे. ओरी हा प्रत्येक बॉलिवूड पार्टीमध्ये दिसतो. ओरी आणि बोलिवूड अभिनेत्रींचे फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कोणतीच एक विशिष्ट अशी अभिनेत्री नाही तर दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, माधूरी दीक्षित, कियारा अडवाणी, सारा अली खान, कतरिना कैफ इतकेदच नाही तर थेट नीता अंबानी यांच्याबरोबर देखील ओरीचा फोटो बघायला मिळतो. पण बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये अगदी सहज वावरणारा हा ओरी नक्की काय करतो हा अनेकांना पडलेला मोठा प्रश्न आहे. हाच प्रश्न एका बॉलिवूड अभिनेत्याने ओरीला विचारला आहे. (Orry and Ranveer Singh video)

ओरी नक्की काय करतो असं अभिनेता रणवीर सिंहने त्याला विचारले असून ओरीने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेता रणवीर ओरीच्या आयुष्याशी संबंधित मनोरंजक प्रश्न विचारत आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्याकडे बघत रणवीरने ओरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि गंमतीने हिंदीत म्हटले आहे की, “अनेकदा आपल्या देशात लोक दोन प्रश्न विचारतात. पहिला म्हणजे कट्टप्पाने बाहुबलीला का मारले? आणि दुसरा म्हणजे हा ओरी नक्की काय करतो?”

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

आणखी वाचा – Bigg Boss 18 : दुसऱ्या आठवड्यात ‘बिग बॉस’मधून ‘हा’ सदस्य घराबाहेर?, सलमान खान चांगलीच शाळा घेणार

रणवीर ओरीला हा प्रश्न विचारात असताना ओरी त्याच्या डोळ्यांवरील गॉगल काढण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा रणवीर कॅमेराकडे बघतो आणि प्रश्न विचारतो तेव्हा ओरीने गंमतीने गॉगल काढण्याचा प्रयत्न केला आणि तो स्वत: लावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, रणवीरने त्याला मध्येच थांबवतो आणि म्हणातो की, “नो चान्स” (संधी नाही). दोघांचा हा व्हिडीओ राधिका अंबानीच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील आहे. या वाढदिवस पार्टीला बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावली होती. तेव्हा ओरी व रणवीर यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे.

आणखी वाचा – ऐश्वर्या रायच्या आयुष्याशी निगडीत पाच रहस्य, याच कारणांमुळे सासरच्या मंडळींनी सोडली अभिनेत्रीची साथ?

दरम्यान, अभिनेता रणवीर सिंग नुकताच बाबा झाला असून त्याच्या चेहऱ्यावर लेक झाल्याचा आनंद पाहायला मिळतो. रणवीर व दीपिका दोघेही रोहित शेट्टीच्या आगामी ॲक्शन चित्रपट ‘सिंघम अगेन’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. या बहुप्रतिक्षित चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Tags: orryOrry and Ranveer Singh Videoranveer singh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Remo D'Souza Booked for Cheating

रेमो डिसूजा व त्याच्या पत्नीवर कारवाई, करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, नक्की प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.