बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीमधील क्युट कपल म्हणजेच रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख. रितेश-जिनीलिया ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. मनोरंजनसृष्टीत कायम चर्चेत असणारी ही जोडी सोशल मीडियावरील त्यांच्या फोटो व व्हिडीओमुळेदेखील तितकीच चर्चेत राहत असते. रितेश-जिनीलिया नेहमीच एकमेकांबरोबरचे अनेक रील-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आणि त्यांचे हे व्हिडीओ चाहत्यांनादेखील भलतेच आवडतात. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होत असतात. कामाबरोबरच ते सोशल मीडियाद्वारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यदेखील काही खास क्षणही शेअर करत असतात. (Riteish Deshmukh painting T-Shirt)
जिनीलिया सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते आणि सोशल मीडियाद्वारे ती आपल्या आयुष्यातील काही खास प्रसंगे शेअर करत असते. जिनीलियाचा आपल्या मुलांबरोबर खास बॉण्ड आहे आणि हा खास बॉण्ड सोशल मीडियाद्वारे कायमच पाहायला मिळतो. अशातच तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आपल्या मुलांच्या शाळेतील हॅलोविनसाठी खास टी-शर्ट रंगवत आहे. रितेश आणि जिनिलियाची दोन्ही मुले ही कायमच फूटबॉल खेळताना दिसतात. त्यांना फुटबॉलची प्रचंड आवड आहे. त्यांचे मैदानावरील फोटो आणि व्हिडीओदेखील अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे रितेश मुलांच्या शाळेत हॅलोविनसाठी त्यांच्या आवडीच्या फुटबॉलचे टी-शर्ट रंगवत आहेत.

आणखी वाचा – Like Aani Subscribe Review : ‘लाईक आणि सबस्क्राराईब’मध्ये गुंतलेली मर्डर मिस्ट्री
जिनीलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फुटबॉलच्या टी-शर्टवर फुटबॉल लावलेले पाहायला मिळत असून रितेश या फुटबॉलना रंगवत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिनीलियाने असं म्हटलं आहे की, “जेव्हा बाबा मुलांना शाळेसाठी होलोवीन जर्सी बनवण्यात व्यस्त असतो”. जिनीलिया ही आपल्या मुलांकडे सतत लक्ष देत असते. ती इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. दोघांचा ‘वेड’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
दरम्यान, रितेशने नुकतेच बिग बॉस मराठी ५ चे होस्टिंग केले. त्याच्या या होस्टिंगचे अनेकांकडून कौतुकही केले गेले. रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या या बिग बॉस मराठी शोने अनेक रेकॉर्डसही मोडले. लवकरच त्याचा हाऊसफुल्ल ५ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.