Salman Khan New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असल्याचं समोर आलं आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सतत अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. त्यांचे पुढील टार्गेट सलमान खान असल्याचे त्यांनी आणि त्यांच्या टोळ्यांनी सांगितले आहे. या दरम्यान, अभिनेत्याने नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे, ज्याची चर्चा सर्वत्र आहे. सलमानने बुलेट प्रूफ असलेली नवी निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. अभिनेत्याकडे आधीच लँड क्रूझर आणि निसान पेट्रोल या गाड्या होत्या. आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याने ही तिसरी कारदेखील खरेदी केली आहे.
‘इटाइम्स’च्या वृत्तानुसार, या बुलेटप्रूफ गाडीची किंमत २ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आधीच्या कारप्रमाणेच सलमान खानने त्याची ही नवी कार दुबईहून आयात केली आहे. सलमानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची नुकतीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोईने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि बाबा सिद्दिकीची सलमानबरोबरची मैत्री हे हत्येमागील कारण सांगितले. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमक्या देण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू-आदित्यच्या नव्या नात्याची सुरुवात, खास भेटवस्तूही दिली अन्…; मालिकेत नवा ट्विस्ट
शुक्रवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी बिश्नोई टोळीने मुंबई वाहतूक पोलिसांना एका संदेशात सलमानला धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच लॉरेन्स बिश्नोईशी असलेले अभिनेत्याचे वैर संपुष्टात यावे यासाठी ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. सततच्या धमक्यांमुळे सलमान नाराज तर आहेच, शिवाय त्याचे कुटुंबीयही घाबरले आहेत. अशा परिस्थितीत, अभिनेत्याची सुरक्षा तर वाढवली गेलीच पण अनेक भक्कम सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन वाहन देखील खरेदी करण्यात आले आहे. असे सांगण्यात येत आहे की. या वाहनामध्ये बॉम्ब अलर्ट इंडिकेटर, जवळच्या गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी जाड मजबूत काचे आणि टिंटेड खिडक्या आहेत, जेणेकरुन वाहन चालक आणि वाहनात बसलेल्या कोणत्याही व्यक्तीची ओळख लपवता येईल.
आणखी वाचा – “लग्नाची सगळी तयारी झालीय पण…”, प्राजक्ता माळीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…
निसान पेट्रोल एसयूव्ही सध्या भारतात उपलब्ध नसल्याने सलमानने ती दुबईहून आयात केली. दुसरीकडे, धमक्या मिळाल्यानंतरही सलमान कामावर परतला आहे. तो १७ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस १८’ च्या सेटवर पोहोचला आणि शुक्रवारी ‘वीकेंड का वार’चे दोन्ही भाग शूट केले. यावेळी, बिग बॉसच्या संपूर्ण टीमला शूट संपेपर्यंत सेटवर थांबण्याचा आदेश देण्यात आला. ६० रक्षकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते आणि सलमानसाठी एक खास कंपाउंड तयार करण्यात आले होते, ज्याच्या मध्यभागी सलमान कडक सुरक्षेत राहणार आहे.