शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सूरज चव्हाण व गौतमी पाटीलची भेट, व्हॅनिटी व्हॅनमध्ये रंगल्या गप्पा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 18, 2024 | 1:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dancer Gautami Patil shared a video of meeting Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan

गौतमी पाटीलने बिग बॉस मराठी ५ विजेता सूरज चव्हाणची भेट घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे

‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व नुकतेच संपले असले तरी या शोची आणि या शोमधील स्पर्धकांची चर्चा अजूनही कमी झालेली नाही. शोमधील स्पर्धक रोजच चर्चेत आहेत, यापैकी एका स्पर्धकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे आणि हा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर त्याने आपलं नाव कोरल्यापासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये सूरजचीच हवा पाहायला मिळत आहे. शो जिंकल्यानंतर सूरजची अनेकजण भेट घेत आहेत. तोही विविध ठिकाणांना भेटी देत आहे. बारामतीजवळच्या मोढवे गावातील गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज आता प्रचंड लोकप्रिय झाला आहे. (Gautami Patil and Suraj Chavan Meeting)

‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी आपल्या गावी घेऊन जाताना गावकऱ्यांनी त्याची मोठी मिरवणूक काढली. त्यानंतर अनेक मान्यवर मंडळींनी त्याची भेट घेतली. गेल्या आठवड्यात सूरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटला आणि त्याच्या या भेटीगाठी अजूनही सुरुच आहेत. अशातच सोशल मीडियावर आपल्या डान्समुळे लोकप्रिय असलेली गौतमी पाटीलनेही सूरज चव्हाणची भेट घेतली आहे. गौतमीने सूरजच्या या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सूरज व गौतमीचे अनेक चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

आणखी वाचा – ‘पाऊस’ वेबसीरिजमधील ट्वीस्ट आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अजूनही सायलीला विशालची आठवण, पुढे काय घडणार?

गौतमी व सूरज हे दोघेही सोशल मीडिया स्टार आहेत. गौतमी पाटीलचा कोणताही कार्यक्रम असो तिथे तुडूंब गर्दी बघायला मिळते. गौतमीची एक झलक बघण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यात सूरजने ‘बिग बॉस’चे विजेतेपद पटकावल्यामुळे त्याचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. गौतमी व सूरज यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. “गौतमी आणि सूरज यांनी एक असं उदाहरण घालून दिलं आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्य करा फक्त आपल्याकडून १००% दिले पाहिजे मग त्याचं फळ ईश्वर देईल” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये गायकांना मिळते कवडीमोल रक्कम, सुप्रसिद्ध गायकानेच आणलं सत्य समोर, म्हणाला, “पैसे मागितले तर…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाणने एन्ट्री घेतली होती तेव्हा अनेकांनी त्याच्याबद्दल नाकं मुरडली होती. त्याच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र सूरजने आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने आणि वागणूकीने अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे अनेकांचा नावडता सूरज आता सर्वांचाच आवडता झाला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.

Tags: gautami patilGautami Patil and Suraj Chavan MeetingSuraj Chavan Meeting
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Armaan Malik Car Accident 

Video : अरमान मलिक मृत्यूच्या दारातून परत, कारचा टायरच फुटला अन्…; दाखवली भीषण परिस्थिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.