रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सारा अली खानच्या नवीन प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, मुंबईत खरेदी केली इतकी महागडी जागा

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 17, 2024 | 3:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Sara Ali Khan bought new property in Mumbai Andheri West with her mother Amruta Singh

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिची आई अमृता सिंगबरोबर मुंबईमध्ये नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सारा अली खान. तिने आतापर्यंत मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. आपल्या व्यवसायिक आयुष्याबरोबरच सारा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहत असते. अशातच सध्या तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि याचे कारण म्हणजे तिने मुंबईत घेतलेली नवीन प्रॉपर्टी. साराने आपल्या आईच्या मंदतीने मुंबईत करोडोंच्या दोन प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. मुंबईतील अंधेरी भागात ही प्रॉपर्टी तिने घेतली आहे. ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर मायलेकींनी ही मोठी खरेदी केली आहे. (Sara Ali Khan Property)

सारा अली खानने तिची आई अमृता सिंगबरोबर अंधेरी वेस्टमधील वीरा देसाई रोडवर असलेल्या सिग्नेचर बिल्डिंगमध्ये २२.२६ कोटींचे दोन ऑफिस खरेदी केले आहेत. या खरेदी केलेल्या दोन्ही मालमत्तांसाठी त्यांनी १.३३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कदेखील भरले आहे. floortap.com नुसार, साराच्या या दोन नवीन कार्यालयांचे क्षेत्रफळ २,०९९ चौरस फूट आहे आणि प्रत्येक कार्यालयाची किंमत ११.१३ कोटी रुपये इतकी आहे. दोन्ही कार्यालयांसाठी १० ऑक्टोबर २०२४ रोजी कराराची नोंदणी झाली होती. 

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

आणखी वाचा – Video : मावशी झाल्याचे कळताच तितीक्षाला रडू आवरेना, थेट हॉस्पिटलला जात भेट घेतली अन्,…; व्हिडीओ समोर

सारा आणि अमृताने गेल्यावर्षी म्हणजेच ११ जुलै २०२३ रोजी याच इमारतीत चौथ्या मजल्यावर एक फ्लॅट ९ कोटी रुपयांना खरेदी केला होता आणि मुद्रांक शुल्कही भरले होते. त्यासाठी ४१.०१ लाख रुपये होते. स्वत: सारा अली खानने अद्याप तिच्या या नवीन मालमत्तेबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. दरम्यान, अमृता व सैफ २००४ मध्ये वेगळे झाले होते. तेव्हापासून सारा तिची आई अमृताबरोबर राहते आणि तिचा धाकटा भाऊ इब्राहिम अली खानदेखील त्यांच्याबरोबर राहतो.

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत मोठा ट्विस्ट! राजाध्यक्षांच्या कुटुंबात केदारची एन्ट्री, ‘हा’ अभिनेता साकारत आहे भूमिका

तसेच, साराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘ए मेरे वतन’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट १९४७च्या स्वातंत्र्य संग्रामावर बनला होता आणि त्याची निर्मिती करण जोहरने केली होती. या चित्रपटात इमरान हाश्मीचीही महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. त्यानंतर ती आता ‘मेट्रो…ये डेज’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, अली फजल आणि अनुपम खेर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Tags: sara ali khanSara Ali Khan PropertySara Ali Khan Property News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ira Khan Birthday Wish

लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला आयरा खानची नवऱ्यासाठी खास पोस्ट, Unseen Photo केले शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.