रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानला दिली Y Plus सुरक्षा, ‘या’ सुरक्षेसाठी सरकार किती कोटी रुपये खर्च करणार?, रक्कम ऐकून व्हाल थक्क

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 17, 2024 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Salman khan Given Y Plus Security Expenditure

सलमान खानला दिली Y Plus सुरक्षा, 'या' सुरक्षेसाठी सरकार किती कोटी रुपये खर्च करणार?,

Salman khan Given Y Plus Security Expenditure :  राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिष्णोई समाजाचं पुढील टार्गेट असल्याचं समोर आलं आहे. यामुळे काल अभिनेत्याची सुरक्षा एका थराने वाढवण्यात आली असल्याचं समोर आलं. सलमान खानच्या सुरक्षेवर सरकार दर महिन्याला किती पैसा खर्च करतंय आणि वर्षाला किती खर्च करतंय याचा हिशोब धक्कादायक आहे.

वाय प्लस सिक्युरिटी म्हणजेच जवळपास २५ सुरक्षा कर्मचारी सलमान खानच्या सुरक्षेत असतील. ज्यामध्ये सुमारे 2 ते 4 NSG कमांडो आणि पोलिस सुरक्षा कर्मचारी म्हणजेच सुमारे २५ सुरक्षा कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. या सुरक्षा दलाकडे २ ते ३ वाहने आहेत. तज्ज्ञांच्या मते, Y Plus सुरक्षेवर दरमहा सुमारे १२ लाख रुपये खर्च होतो, म्हणजेच वार्षिक खर्च सुमारे १.५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही वाय प्लस सिक्युरिटी टीमसह उपस्थित असलेल्या लोकांची संख्या सुरक्षेच्या कारणास्तव स्पष्टपणे सांगता येणार नाही.

आणखी वाचा – बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमानच्या जीवाला धोका, खान कुटुंब तणावात, अरबाजने सांगितली कशी आहे परिस्थिती, म्हणाला, “बरेच काही चालू आहे आणि…”

तज्ज्ञांच्या मते, सध्या सलमान खानच्या सुरक्षेवर करोडोंचा खर्च आहे. वाय प्लस सुरक्षा, मुंबई पोलिस कर्मचारी तैनात, सलमान खानचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक, सलमानच्या सुरक्षेवरील एकूण वार्षिक खर्च सुमारे ३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाल्यानंतर आणि त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला तेव्हापासून मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. सिव्हिल वेशातील मुंबई पोलिस कर्मचारीही त्यांच्या घराजवळ हजर आहेत.

आणखी वाचा – तिसऱ्या मजल्यावरुन पडून सुप्रसिद्ध गायकाचा मृत्यू, वयाच्या ३१ व्या वर्षी निधन, कारणही आले समोर

मात्र सध्याच्या परिस्थितीत ज्या दिवसापासून सलमान खानचा खास मित्र मानल्या जाणाऱ्या बाबा सिद्दिकीची हत्या झाली आणि त्यामागे लॉरेन्स गँगचा हात असल्याचे समोर आलं तेव्हापासून मुंबई पोलीस सुपरस्टारच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाले आहेत. यावरुन सलमान खानचा भाऊ अरबाजनेही भाष्य केलं. अरबाज खान म्हणाला, “आम्ही ठीक आहोत. मी असे म्हणणार नाही की आम्ही पूर्णपणे ठीक आहोत, कारण सध्या कुटुंबात बरेच काही चालू आहे. पूर्णपणे प्रत्येकजण काळजीत आहे”.

Tags: salman khanSalman khan Given Y Plus Security ExpenditureSalman Khan Security
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi Abhijeet Kelkar new entry in rajadhyaksha family as a Kedar

Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत मोठा ट्विस्ट! राजाध्यक्षांच्या कुटुंबात केदारची एन्ट्री, 'हा' अभिनेता साकारत आहे भूमिका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.