रितेश आणि जिनीलीया म्हणजेच महाराष्ट्रचे लाडके दादा वहिनी त्यांच्या रोमॅंटिक अंदाजामुळे कायमच चर्चेत असतात.कलाकार किती ही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असायला हवेत याच उत्तम उदाहरण म्हणजे रितेश जिनीलीया आहेत. त्यांच्या अभिनयातील सहजतेमुळे त्यांचा चाहता वर्ग ही मोठा आहे. रितेश आणि जिनीलीया यांचं नाव निघालं की आता वेड या चित्रपटाचं नाव ओठी आल्या शिवाय राहत नाही.(Ritesh Deshmukh Son Birthday)
रितेश देशमुख आणि जिनीलीया हे या दोघांकडे आदर्श पालक म्हणून देखील पहिले जाते. यांची मुलं रिआन आणि रायल हे कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावर कायमच त्यांचं कौतुक होताना पाहायला मिळत.रितेश आणि जिनीलीयाचा मुलगा रायल याचा काल वाढदिवस होता. जिनीलीयाने रायल साठी एक भावुक पोस्ट देखील केली होती.जिनिलियाच्या कॅप्शनने प्रत्येक पालक भावुक होईल. तिच्या पोस्टवर कलाकार आणि प्रेक्षकांनी कमेंट करून रायलला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या.
हे देखील वाचा : ‘तुला आता चालण्यासाठी माझी गरज नाही’…लेकाच्या वाढदिवसनिमित्त जिनिलीयाचा खास सल्ला
पाहा काय आहे हे खास गिफ्ट? (Ritesh Deshmukh Son Birthday)
रितेशने रायलच्या वाढदिवसाचे काही खास क्षण त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत.अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानने रायल साठी खास केक आणला होता. फुटबॉल आणि मेस्सी हे रायलचे आवडते आहेत. आणि याच थीमचा केक अर्पिताने रायलसाठी आणला होता. केक बघून रायलची उत्सुकता वाढलेली उत्सुकता त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. तसेच रितेश त्या स्टोरीमधून अर्पिता आणि तिच्या कुटुंबाचे आभार देखील मानले आहेत.(Ritesh Deshmukh Son Birthday)
