रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 मध्ये येणार विवियन डिसेनाची पूर्वाश्रमीची पत्नी?, प्रश्न विचारताच म्हणाली, “शोमध्ये एंट्री करणं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 10, 2024 | 1:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 18 Wildcard Contestant

'बिग बॉस १८' मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येण्याबाबत विवियन डीसेनाच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा खुलासा

Bigg Boss 18 Wildcard Contestant : ‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा ‘बिग बॉस’ हिंदीकडे लागल्या आहेत. सलमान खानचा सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ नेहमीच चर्चेत असलेल्या कार्यक्रमापैकी एक आहे. त्यामुळे यंदाचंही हे पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या या ‘बिग बॉस १८’च्या पर्वात बॉलिवूड, टेलिव्हिजन, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा समावेश असलेला दिसून आला. यावेळी कार्यक्रमात अनेक टेलिव्हिजन कलाकारांचा सहभाग दिसत आहे. दरम्यान, या रिऍलिटी शोमध्ये विवियन डिसेनाची सर्वाधिक चर्चा होत आहे. शोमध्ये त्याची स्पष्टवक्ते शैली पाहायला मिळत आहे.

आता या सगळ्या दरम्यान एका बातमीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. विवियन डिसेनाची माजी पत्नी वहबिज दोराबजी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मात्र, आता अभिनेत्रीने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली असून ती या सीझनचा भाग नसल्याचे सांगितले आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, “माझ्या ‘बिग बॉस’मध्ये जाण्याबाबत अफवा पसरत आहेत, मला त्या दूर करायच्या आहेत. मी या वर्षी शोमध्ये एंट्री घेत नाही आणि माझी तशी इच्छाही नाही”.

आणखी वाचा – Video : कोल्हापूरकरांनी जिंकलं! डीपीला भेटण्यासाठी रस्त्यावर हजारोंची गर्दी, क्षणोक्षणी वडिलांची होती साथ, भावुक व्हिडीओ व्हायरल

पुढे वहबिज म्हणाली, “माझ्या आयुष्यात जे काही आहे त्यात मी खूप आनंदी आहे आणि माझी शांती गमावू इच्छित नाही. मी भविष्यात शोचा नक्कीच विचार करेन, पण या वर्षी अजिबात नाही. मी माझा नवीन शो Deewaniyat चं शूटिंग सुरु झालं आहे. जे लवकरच स्टार प्लसवर सुरु होईल. पडद्यावर परत येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे”.

आणखी वाचा – चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली, ‘तो’ व्हिडीओ पाहून अंकिता वालावलकर म्हणाली, “त्याला सांभाळायची गरज आणि…”

विवियन व वहबिज यांची भेट ‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. यानंतर ते प्रेमात पडले आणि २०१३ मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांची एकत्र जोडी चाहत्यांना खूप आवडली. मात्र काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. त्याने २०१७ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. बिग बॉसबद्दल सांगायचे तर, शोमध्ये विवियन चाहतबरोबर भांडताना दिसत आहे. झोपण्याच्या जागेवरुन दोघांमध्ये भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळालं.

Tags: Bigg Boss 18 Wildcard ContestantVahbiz DorabjeeVahbiz Dorabjee and vivan dsena
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
diljit dosanjh on ratan tata

Video : जर्मनीमध्ये सुरु होतं कॉन्सर्ट, रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजित दोसांझने केलं असं काही की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.