रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझी लायकी आणि उंची किती?”, पॅडी कांबळेंना नको नको ते बोलले अभिजीत बिचुकले, म्हणाले, “महाराष्ट्रात तुझे किती बाप…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 9, 2024 | 2:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet bichukale criticized Bigg boss marathi season 5 fame paddy kamble video goes viral

अभिजीत बिचुकले पॅडी कांबळे यांच्यावर भडकले असून अपशब्द वापरत त्यांनी पॅडीवर टीका केली आहे.

‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ संपलं असलं तरी या यंदाच्या या पर्वाची सर्वत्र क्रेज सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या पर्वातील ज्येष्ठ कलाकार पॅडी कांबळे यांचा सहभागही विशेष चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला. विशेषतः घरातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या खेळाचं सगळ्यांनीच विशेष कौतुक केलं. अशातच अभिजीत बिचुकले यांनी पॅडी कांबळेंबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. पंढरीनाथ यांच्याबाबत बोलताना अभिजीत बिचुकले यांनी अपशब्द वापरले. ‘बिग बॉस’च्या घरात बिचुकले आले होते तेव्हा पॅडी कांबळेंनी त्यांच्या डॉक्टरेटच्या पदवीबद्दल विचारणा केली, हे बिचुकलेंना खटकलं. यावरुन अभिजीत बिचुकले आता भडकले असून ते पंढरीनाथ यांच्यावर जाहीर टीका केली. (Abhijeet Bichukale on Paddy Kamble)

‘चालु वार्ता’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अभिजीत बिचुकलेंनी पंढरीनाथ कांबळे यांच्याबाबत केलेलं भाष्य समोर आलं आहे. ते म्हणाले, “‘बिग बॉस मराठी’ विशेष करुन अभिजीत बिचुकलेमुळे गाजलं आहे. त्याच्यानंतर मी हिंदी ‘बिग बॉस’मध्ये गेलो आणि त्यामध्ये मी कोणा-कोणाबरोबर होतो हे काही सांगायची गरज नाही. यानंतर मी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहुणा म्हणून गेलो. तेव्हा ‘बिग बॉस’ म्हणाले, डॉक्टर अभिजीत बिचुकले आपलं स्वागत आहे. त्याच्यानंतर ज्याला गेली २५ वर्ष कामं नाही आहेत तो म्हणजे पॅड्या कांबळे. मला कोणते डॉक्टरेट आहात?, असं विचारतो”.

View this post on Instagram

A post shared by Paddy Kamble (@paddykamble)

आणखी वाचा – “माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि…”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अंकिता वालावलकर संतापली, म्हणाली, “उगाच भांडण लावत…”

अपशब्द वापरत अनेक अपमान करत पुढे बिचुकले असं म्हणाला की, “तर पॅड्या कांबळे तुला एकच सांगतो, तू ‘बिग बॉस’चाही अपमान केला आहेस आणि माझी डॉक्टरेट विचारलीस ना. मी तुझ्यासह सर्व माध्यमांना डॉक्टरेटचे प्रमाणपत्र दाखवतो. पण तू किती पापांचा आहेस, महाराष्ट्रात तुझे किती बाप आहेत, हे सगळे बाप माझ्यापुढे घेऊन ये”. यानंतर पॅडी कांबळेला अभिजीत यांनी अपशब्द वापरत, “तुझी लायकी किती, तुझी उंची किती. मी एक दिवस ‘बिग बॉस’मध्ये असतो ना तर तुला संडासात कोंबुन फ्लश केलं असतं”.

आणखी वाचा – Video : मिरवणूक, भेटण्यासाठी तुफान गर्दी अन्…; सूरज चव्हाणचं गावात झापुक झुपूक स्टाईल स्वागत, व्हिडीओ व्हायरल

पुढे तो असंही म्हणाला, “मी फक्त शाहरुख, आमिर, अभिजीत बिचुकले यांना ओळखतो. जे आता डॉ. अभिजीत बिचुकले आहेत. मी अवधूत गुप्तेला ओळखतो, निलेश साबळेला ओळखतो. मिलिंद इंगळेला ओळखतो. वैशाली सामंतला ओळखतो आणि श्रावणी देवधर यांना मी काकू म्हणतो. कुठलेही लुंगे सुंगे सांगितली आणि त्याचा राग धरशील. तुला एक सांगतो तू बोलला आहेस म्हणून मी बोलतो. तुझ्या घरात येऊन, तुला बोकड माहीत आहे का?. तुझ्या बापजन्मी बोकड खायला मिळालं का?, पीठमाग्या, तुला खायला अन्न नव्हतं पण तुझ्या घरात येऊन…”

Tags: abhijeet bichukale on paddy kambleAbhijeet bichukale videoabhijeet bichukale viral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Arbaaz Patel responded on Nikki Tamboli using him for the game see the details

"निक्कीमुळेच माझी दुसरी बाजू समोर आली", अरबाज पटेलचं वक्तव्य, आकंठ प्रेमात, म्हणाला, "माझ्या भावना..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.