गायक अदनान सामी हा नेहमी चर्चेत असतो. त्याच्या आवाजाच्या जादुने रसिकप्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तेरा चेहरा’, ‘कभी नही’, ‘नैना’ अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. मात्र आता तो त्याच्या गाण्यामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहेत. अदनानच्या आईचं निधन झालं असून तिने याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. निधनाचे कारण अद्याप समोर आले नाही. पण त्याने आपल्या आईच्या जन्मदिवसाची आणि निधनाची तारीख लिहिली आहे. हा फोटो शेअर करत “बेगम नौरीन सामी खान, १९४७-२०२४” असे लिहिले आहे.अदनानसाठी सर्व कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे. (adnan sami mother passed away)
अदनानने आईचा फोटो शेअर करत लिहिले की, “अत्यंत दुखाने मी माझ्या आईच्या निधनाची माहिती देत आहे.आम्हाला खूप दु:ख झाले आहे. ती एक महान महिला होती. तिने आम्हाला खूप प्रेम व आनंद दिला. आम्हाला त्यांची खूपच आठवण येणार आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. फिरदौस..आमीन”.
दरम्यान अदनानच्या आईच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा मित्र-परिवार व मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्याचे सांत्वन केले आह. एका नेटकऱ्याने लिहिले की, “तुम्ही आता आराम करा. देव तुम्हाला या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मदत करो”. तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला या दु:खातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो”.
दरम्यान अदनानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, याआधी तो सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील ‘भर दो झोली’ या गाण्यामुळे अधिक चर्चेत आला होता. नऊ वर्षांनंतर अदनानला पुन्हा ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अदनान सध्या म्युजिकल हॉरर फिल्म ‘कसूर’मध्ये रोमॅंटिक गाणं गाणार आहे. गायिका पायल देवबरोबर तो गाताना दिसणार आहे. याचे संगीत जावेद मोहसीनने दिले आहे. यामध्ये अफताब शिवदासानी, उर्वशी रौतेला व पंजाबी गायक जस्सी गिल दिसून येणार आहेत.