रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 मध्ये निया शर्मा नसणार? पोस्टद्वारे स्वत: केला खुलासा, म्हणाली, “मला दोष देऊ नका कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 6, 2024 | 12:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 18 updates Nia Sharma revealed that she will not participate in the show and apologized her fans

Bigg Boss 18 मध्ये सहभागी होणार नसल्याचा निया शर्माने केला खुलासा, माफीही मागितली अन्...

Bigg Boss 18 : सलमान खान होस्ट करत केलेला लोकप्रिय रिअ‍ॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस १८’ आज (रविवार) रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. मात्र काहींच्या नावावर शिक्कामोर्तब होणे अजून बाकी आहे. त्यात प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री निया शर्माही या शोमध्ये भाग घेणार असल्याच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. पण आता अखेर निया शर्मा ‘बिग बॉस’च्या १८व्या  सीझनचा भाग होणार नसल्याचे समोर आले आहे. ती या शोमध्ये सहभागी होणार नसल्याची बातमी आधीच व्हायरल झाली होती, पण आता नियाने स्वतः एक पोस्ट शेअर करत याबद्दल खुलासा केला आहे आणि चाहत्यांची माफीही मागितली आहे. (Bigg Boss 18 Nia Sharma)

निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, “तुमच्या प्रचंड पाठिंब्यामुळे मी भारावून गेले आहे. तुमच्या या प्रेमामुळे आणि वेडेपणामुळे मला ‘बिग बॉस’च्या घरामध्ये जावेसे वाटले. तसंच गेल्या १४ वर्षात मी काय कमावले याची जाणीवदेखील मला झाली. मी असे म्हणू शकत नाही की, तुम्ही माझ्या नावाचा केलेला प्रचार आणि तुम्ही माझ्या नावाचा केलेला वापर मी एन्जॉय केला नाही. परंतु कृपया मला दोष देऊ नका आणि मित्रांनो क्षमस्व… ती मी नव्हते”.

आणखी वाचा – Video : ‘सातव्या मुलीची…’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने घेतली आलिशान कार, सोशल मीडियावर शेअर केला खास व्हिडीओ

याआधीही निया शर्माला ‘बिग बॉस’चा भाग बनण्याची ऑफर अनेकदा आली होती, मात्र तिने नेहमीच ही ऑफर नाकारली. मात्र, तिने यंदा ही संधी स्वीकारून चाहत्यांना आश्चर्यचकित केले असल्याचे म्हटलं गेलं. गेल्या आठवड्यात, ‘खतरों के खिलाडी १४’ च्या फिनालेदरम्यान रोहित शेट्टीने तिला पहिली पुष्टी केलेली स्पर्धक म्हणून घोषित केले आणि चाहत्यांना गोंधळात टाकले. पण आता नियाच्या नावाबाबत एक जबरदस्त ट्विस्ट समोर आला आहे. तो म्हणजे ती या शोमध्ये सहभागी होणार नाही.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्यावर पैशांचा गैरव्यवहार केल्याबद्दल तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, यंदाच्या ‘बिग बॉस १८’मध्ये हेमलता शर्मा, नायरा बॅनर्जी, मुस्कान बामने, तनजिंदर पाल सिंग बग्गा, रजत दलाल, चुम दरंग, अतुल किशन, करणवीर मेहरा, शेहजादा धामी, विवियन जिसेना, ईशा सिंग, श्रुतिका राज अर्जुन, चगत पांडे हे कलाकार सहभागी होणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र याबद्दल नेमका खुलासा आजच होईल.

Tags: Bigg Boss 18 Nia SharmaBigg Boss 18 Nia Sharma Marathi NewsNia Sharma Not In Bigg Boss 18 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tujhyat Jeev Rangala serial fame Akshaya Deodhar shared romantic post for husband Hardeek Joshi on the occasion of his birthday

हार्दिकच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अक्षयाची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “माझ्या हास्याचे कारण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.