शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi चे सगळे सदस्य पुन्हा एकत्र, आर्या नसल्यामुळे प्रेक्षकांनी विचारला जाब, म्हणाले, “नको ते चाळे दाखवता पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 5, 2024 | 1:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 arya jadhav missing

'बिग बॉस'च्या घरात आर्या जाधवची गैरहजेरी पाहून नेटकरी भडकले

Bigg Boss Marathi 5 :   ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या ६ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा ग्रँड फिनाले अगदी दिमाखात पार पडणार आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरात शेवटचे सहा फायनलिस्ट उरले आहेत. निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर हे सहा स्पर्धक असून यापैकी कोणत्या स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील सहा स्पर्धकांना पाठिंबा व शुभेच्छा देण्यासाठी घरात या पर्वातील सर्व एलिमिनेटेड सदस्य घरात प्रवेश घेणार आहेत. याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे.

बिग बॉस मराठी ५ चा नवीन प्रोमो कलर्स मराठी वाहिनीने शेअर केला आहे. त्यात घरातील टॉप ६ सदस्य बाहेर गेलेल्या सर्व स्पर्धकांना पाहून आनंदी होतात. या प्रोमोमध्ये घरातून बाहेर पडलेले सदस्य दिसत आहेत, पण त्यापैकी एका सदस्याला बोलावण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रोमो पाहून विशेष चर्चा रंगलेली दिसत आहे. रुषोत्तमदादा पाटील, घनश्याम दरवडे, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, वर्षा उसगांवकर, संग्राम चौगुले, पंढरीनाथ कांबळे, अरबाज पटेल, योगिता चव्हाण, निखिल दामले यांची घरात एन्ट्री होताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पण या सर्वांमध्ये एक सदस्य दिसत नाही.

आणखी वाचा – गुहेसारख्या खोल्या, घराला किल्ल्यासारखा टच, १०७ कॅमेरे अन्…; Bigg Boss 18 च्या घराची पहिली झलक, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

काही दिवसांपूर्वी निक्कीला कानशिलात मारलेली आर्या जाधव ही स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात आलेली दिसत नाही आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आर्याच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारला आहे. एका टास्कदरम्यान निक्की व आर्या यांच्यात वाजलं आणि त्याचवेळी रागाच्या भरात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. त्यानंतर ‘बिग बॉस’ने आर्याला दोन दिवस जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. त्यानंतर झालेल्या भाऊच्या धक्क्यावर आर्याला घरातून बाहेर काढलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “हाच प्लेबॉय…”, निक्की अरबाजमधील जवळीक पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “प्रेमाचं नाटक करत…”

आर्याला कुणालाही न भेटू देता घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर आता रियुनियनमध्येही आर्या काही ‘बिग बॉस’मध्ये आल्याचं दिसत नाही हे पाहून नेटकऱ्यांनी प्रोमोवर कमेंट्स केल्या आहेत. “आता लहान मुले हा शो बघत नाहीत का?, आर्याने कानाखाली मारली तेव्हा लहान मुलं हा शो बघत होते आणि हे असले नको ते चाळे तुम्ही दाखवता तेव्हा लहान मूल बघत नाहीत का?. हे असे नको ते चाळे दाखवून आमच्या लहान मुलांवर नको ते संस्कार आणि नको ते परिणाम होतील”, “आर्याला बोलावलं नाही का?”, “आर्याला का नाही बोलावलं. ‘बिग बॉस’ घाबरता का?, कसले तुमचे नियम जरा बदला”, अशा कमेंट करत आर्या न येण्यावरुन सवाल केला आहे.

Tags: arya jadhav missingbigg boss marathibigg boss marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
kareena kapoor son video viral

Video : सैफ-करीनाच्या लेकाची पापाराझींवर दादागिरी, जोरात अंगावर ओरडला अन्…; नेटकऱ्यांना आठवल्या जया बच्चन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.