शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझ्यावर मला विश्वास आणि…”, सोनू निगमचा अभिजीत सावंतला पाठिंबा, व्हिडीओद्वारे म्हणाला, “अधिकाधिक मत द्या कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 4, 2024 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood singer Sonu Nigam support to Abhijeet Sawant by sharing a special video.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनेही खास व्हिडीओ शेअर करत अभिजीत सावंतला पाठिंबा दिला आहे.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा जोरदार सुरू आहे. अशातच सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंतची लोकप्रियतासुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल’चा विजेता असलेल्या अभिजीत सावंतने सुरेल आवाजाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील त्याचा खेळ पाहून प्रेक्षक त्याच्या जिद्दीचं आणि चिकाटीचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर अभिजीतला जोरदार पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अभिजीतच या  शोचा विजेता होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. (Sonu Nigam support to Abhijeet Sawant)

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला आता सुरुवात झाली आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरात एकूण ७ सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे उर्वरीत सदस्यांना आता मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. घरातील आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी सर्वजण प्रेक्षकांना आवाहन करत आहेत. अशातच बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनेही खास व्हिडीओ शेअर करत अभिजीतला आपला पाठिंबा दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

आणखी वाचा – “घराबाहेर येताच मी तिला भेटणार आणि….”, पॅडींच्या अपमानावरुन विशाखा सुभेदार जान्हवीला खडसावणार, म्हणाल्या, “तिचं खोटं नाटक…”

अभिजीतच्या सोशल मीडियावर सोनू निगमचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनूने असं म्हटलं आहे की, “प्रिय अभिजीत, तुम्ही ‘बिग बॉस’च्या घरात खूप छान खेळत आहात. ‘बिग बॉस मराठी’बद्दलची तुमची सर्व माहिती मला मिळत आहे आणि तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला मी खूप चांगलं ओळखतो. तू खूप चांगला माणूस आहेस आणि अगदी योग्य आहात. तू जे पण करशील चांगलंच करशील असा मला विश्वास आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा आणि माझी सर्वांना विनंती आहे की अभिजीतला जास्तीत जास्त मत देऊन जिंकवा. लवकरच भेटू”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून आणखी एक जण घेणार निरोप, कोण असेल हा सदस्य? ‘या’ स्पर्धकाच्या नावाची चर्चा

दरम्यान, जुलै महिन्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली होती. टीआरपीमध्येही हा कार्यक्रम अव्वल ठरला होता. तर नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले गेले. अशातच आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत हा शो संपणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच ०६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

Tags: abhijeet sawantbigg boss marathi 5sonu nigam
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 jahnavi killekar

Bigg Boss Marathi : "जान्हवीलाच बाहेर काढा", निक्की-जान्हवीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्यानंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, "ओव्हर ॲक्टिंगच्या मानकरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.