शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : असा जावई हवा गं बाई! सासूबाईंनी अभिजीतसाठी शूट केला खास व्हिडीओ, म्हणाल्या, “आमच्या अभिजीतला तुम्ही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 3, 2024 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 abhijeet sawant family

अभिजीत सावंतच्या आई व सासूबाईंचा पाठिंबा असलेला व्हिडीओ चर्चेत

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यंदाचे हे पर्व १०० दिवसांवरुन ७० दिवसांवर आले, याची ‘बिग बॉस’ यांनी अधिकृतरीत्या घोषणा केली. आता ‘बिग बॉस’च्या घरात सात स्पर्धक उरले आहेत. या सात स्पर्धकांपैकी एक स्पर्धक विजेतेपदावर नाव कोरणार आहे. तर या आठवड्यात मीड वीक एविक्शन पार पडणार आहे. त्यामुळे या सात सदस्यांपैकी कोणाची अंतिम फेरीत जाण्याची संधी हुकतेय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर या पर्वाची पहिली ग्रँड फायनलिस्ट निक्की तांबोळी ठरली.

अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर व वर्षा उसगांवकर हे स्पर्धक आता ‘बिग बॉस’च्या घरात उरले आहेत. नॉमिनेट होण्यापासून वाचण्यासाठी आता स्पर्धकांचे नातेवाईक, चाहते, कुटुंबीय त्यांना सपोर्ट करताना दिसत आहेत. शिवाय ते प्रेक्षकांना भरभरुन वोट करण्याची विनंती करतानाही दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील अभिजीत सावंतच्या आई व सासू बाईंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “शो वाऱ्यावर सोडून का गेलात?”, Bigg Boss मधून रितेश देशमुख गायब होताच प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “जमत नव्हतं तर…”

View this post on Instagram

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

अभिजीत सावंतच्या सोशल मीडियावर त्याच्या आई व सासूबाईंचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला अभिजीतची आई असं म्हणताना दिसत आहे की, “माझा मुलगा जसा माझा आहे, तसाच तो महाराष्ट्राचा पण आहे. ‘इंडियन आयडल’च्या वेळी महाराष्ट्राने जसं त्याला भरभरुन प्रेम दिलं, त्याला आपुलकी दिली आणि त्याला जिंकवून आणलं. त्याच प्रमाणे तो आता ‘बिग बॉस’मध्ये आहे. त्यामुळे तुमचा मुलगा समजून त्याला मत करुन जिंकून आणा”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “अंकिताच घराबाहेर गेली”, ‘त्या’ व्हिडीओवर प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, “हे धक्कादायक आणि…”

याच व्हिडीओमध्ये अभिजीतच्या सासूबाई म्हणाल्या की, “एवढी २० वर्ष तुम्ही जे अभिजीतला प्रेम दिलंय, ते आताही द्या. आम्ही जसं त्याला मत करतोय तसं तुम्ही देखील द्या. आमच्या अभिजीतला मत द्या”. आई व सासूबाईंचा व्हिडीओ अभिजीतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. “माझ्या दोन्ही आईंना धन्यवाद. देवाने मला दोन इतक्या प्रेम व पाठिंबा देणाऱ्या आई दिल्या. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर असू दे”.

Tags: abhijeet sawantabhijeet sawant familybigg boss marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aishwarya Narkar On Trollers

"स्वतःच्या लेकी-सूनांबरोबर असंच वागतात का?", स्त्रियाच अधिक ट्रोल करत असल्याचं ऐश्वर्या नारकरांचं वक्तव्य, म्हणाल्या, "बायकाच अधिक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.