रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जयपूरमध्ये तृप्ती डिमरीवर बंदी, चेहऱ्याला काळंही फासलं अन्…; अभिनेत्रीवर नागरीक संतप्त, नेमकं प्रकरण काय?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 2, 2024 | 10:44 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress Tripti Dimri's face blackened in Jaipur video going viral on social media

अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘ॲनिमल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात राजकुमार रावचीही भूमिका आहे. अभिनेत्री या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच तृप्ती डिमरी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका कार्यक्रमासाठी पैसे घेऊनही त्या कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचा आरोप अभिनेत्री तृप्ती डिमरीवर करण्यात येत आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरीने फी घेऊन कार्यक्रमाला हजेरी न लावल्याचा आरोप जयपूरच्या इव्हेंट आयोजकांनी केला आहे. (Tripti Dimri Face Blackened)

तृप्ती डिमरी हिच्यावर जयपूरमधील एका कार्यक्रमासाठी साडे पाच लाख रुपये मानधन घेतल्याचा दावा कार्यक्रमाच्या आयोजकांकडून केला जात आहे आणि त्यानंतर तिने कार्यक्रमालाही हजेरी लावली नसल्याचा आरोप आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये काही महिला तृप्ती डिमरीवर आरोप करताना आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा दावा करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला म्हणतेय की “तिचे (तृप्ती डिमरी) चित्रपट कोणीही पाहणार नाही. आश्वासन देऊनही ती आली नाही, तिने आपला वेळ मॅनेज करायला शिकावं. ती अजून एवढी मोठी झाली नाहीय, तिचं नावही कुणाला माहीत नाही”.

Muh Kaal Karo 😱 #TriptiDimri skips event after taking 5 Lacs; Women group blackened her poster #MovieTalkies pic.twitter.com/45spP3LrMa

— $@M (@SAMTHEBESTEST_) October 1, 2024

आणखी वाचा – “मतदानाची वारी लवकरच येत असताना…”, ‘धर्मवीर २’बद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “महाराष्ट्रातली जनता…”

यापुढे ती महिला असं म्हणते की, “ ती कोण आहे हे पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. ती सेलिब्रिटी म्हणवण्याच्या लायकीची नाही”. या व्हिडीओमध्ये ती महिला तृप्तीच्या पोस्टरला काळ्या मार्करने क्रॉस करताना दिसत आहे आणि म्हणते आहे की, “तिचा चेहरा काळा करा”. तर कार्यक्रमामधील दुसरी महिला म्हणत आहे की, “आम्ही तिच्यावर गुन्हा दाखल करु. जयपूरने तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा. तिने आज आमची प्रतिष्ठा डागाळली आहे. तिने माझ्याकडून साडे पाच लाख रुपये घेतले आहेत. तिने येथील सर्वांचा अनादर केला. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकूया”.

आणखी वाचा – 02 October Horoscope : ब्रह्मयोगाचा शुभ संयोग झाल्याने कन्या राशीसह ‘या’ पाच राशींच्या संपत्तीत होणार वाढ, जाणून घ्या…

दरम्यान, आरोपांना इट्स मज्जा दुजोरा देत नाही, तसेच तृप्ती डिमरीकडूनही या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तृप्तीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. तिचा कार्तिक आर्यनबरोबरकहा ‘भूल भुलैया ३’ देखील लवकरच येणार आहे आणि ती ‘धडक २’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदीबरोबर दिसणार आहे.

Tags: Animal Fame Actress Tripti Dimribollywood actresstripti dimriTripti Dimri Face Blackened
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli and Aarya Jadhao fight Wild card contestant Sangram Chougule said what actually happened

Bigg Boss Marathi 5 मधील निक्की-आर्या यांच्या ‘त्या’ वादावर संग्राम चौगुलेंचा मोठा खुलासा, म्हणाले, “निक्कीने मारायचा प्रयत्न केला आणि...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.