‘बिग बॉस ओटीटी ३’ फेम अदनान शेख सध्या अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तो गर्लफ्रेंड आयशाबरोबर लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याने लग्नाचे ग्रँड रिसेप्शनदेखील ठेवले होते. यासाठी अनेक इन्फ्लुएन्सर्सनी हजेरी लावली होती. त्याचे सगळे मित्र-मंडळी या समारंभासाठी सहभागी असलेले दिसून आले. मात्र त्याच्या बायकोचा चेहरा हा दरवेळी मास्कने झाकलेला पाहायला मिळाला. अशातच आता अदनान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचं कारणदेखील खूप गंभीर आहे. अदनानच्या बहिणीने त्याच्यावर मारहाणीचे आरोप केले असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हे नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया. (adnaan shaikh againts FIR)
समोर आलेल्या माहितीनुसार, अदनानने काही दिवसांपूर्वी तिला खूप मारलं होतं. त्याच्यावर शारीरिक हिंसा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मात्र नक्की काय झालं? याबद्दल पूर्ण माहिती मिळू शकली नाही. सोशल मीडियावर या प्रकरणाची खूप चर्चा होताना दिसून येत आहे. ट्विटरवर एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये अदनानची बहीण गोरेगावमधील बांगुर नगर येथील पोलिस स्टेशनच्या बाहेर उभी आहे आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगत आहे. यामध्ये ती म्हणत आहे की, “मी बांगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये भावाच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आले होते. त्याने मला मारलं. खूप प्रयत्न केल्यानंतर आज माझी तक्रार नोंदवून घेतली आहे”.
Kalesh btw Adnaan Shaikh's sister and Adnaan Shaikh..!🍽️#ElvishYadav #AdnaanShaikh #ElvishaArmypic.twitter.com/8eqHRt64RO
— Guddu Bhaiya (@Guddu_Bhaiya_07) September 29, 2024
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदनानची बहीण फुरखान शेख नावाच्या कार्यकर्त्याची मदत मागत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फुरखानने सांगितलं की, “अदनानची बहीण माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली होती. सुरुवातीला हा वाद घरीच सोडवण्याचा मी सल्ला दिला होता”.
पण या प्रकरणाची गंभीरता लक्षात आल्यानंतर फुरखान तिला पोलिस स्थानकात घेऊन गेला आणि तक्रार नोंदवण्यास सांगितले. ‘टाइम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार पोलिस लवकरच अदनानला बोलवू शकतात. तसेच प्रकरण न्यायालयात गेले तर अदनानवर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.