रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस ओटीटी’ फेम अदनान शेख वादाच्या भोवऱ्यात, बहिणीकडून मारहाण केल्याचे आरोप, व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 30, 2024 | 1:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
adnaan shaikh againts FIR

अदनान शेख विरोधात बहिणीने दाखल केली तक्रार

‘बिग बॉस ओटीटी ३’ फेम अदनान शेख सध्या अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तो गर्लफ्रेंड आयशाबरोबर लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याने लग्नाचे ग्रँड रिसेप्शनदेखील ठेवले होते. यासाठी अनेक इन्फ्लुएन्सर्सनी हजेरी लावली होती. त्याचे सगळे मित्र-मंडळी या समारंभासाठी सहभागी असलेले दिसून आले. मात्र त्याच्या बायकोचा चेहरा हा दरवेळी मास्कने झाकलेला पाहायला मिळाला. अशातच आता अदनान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचं कारणदेखील खूप गंभीर आहे. अदनानच्या बहिणीने त्याच्यावर मारहाणीचे आरोप केले असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हे नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया. (adnaan shaikh againts FIR)

समोर आलेल्या माहितीनुसार, अदनानने काही दिवसांपूर्वी तिला खूप मारलं होतं. त्याच्यावर शारीरिक हिंसा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मात्र नक्की काय झालं? याबद्दल पूर्ण माहिती मिळू शकली नाही. सोशल मीडियावर या प्रकरणाची खूप चर्चा होताना दिसून येत आहे. ट्विटरवर एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये अदनानची बहीण गोरेगावमधील बांगुर नगर येथील पोलिस स्टेशनच्या बाहेर उभी आहे आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगत आहे. यामध्ये ती म्हणत आहे की, “मी बांगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये भावाच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आले होते. त्याने मला मारलं. खूप प्रयत्न केल्यानंतर आज माझी तक्रार नोंदवून घेतली आहे”.

आणखी वाचा – ५००च्या नोटवर महात्मा गांधी नव्हे तर अनुपम खेर यांचा फोटो, म्हणाले, “काहीही होऊ शकतं आणि…”

Kalesh btw Adnaan Shaikh's sister and Adnaan Shaikh..!????️#ElvishYadav #AdnaanShaikh #ElvishaArmypic.twitter.com/8eqHRt64RO

— Guddu Bhaiya (@Guddu_Bhaiya_07) September 29, 2024

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदनानची बहीण फुरखान शेख नावाच्या कार्यकर्त्याची मदत मागत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फुरखानने सांगितलं की, “अदनानची बहीण माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली होती. सुरुवातीला हा वाद घरीच सोडवण्याचा मी सल्ला दिला होता”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : घरातील सदस्यांनी ठरवली एकमेकांची किंमत, जान्हवीला ४० हजाराचा टॅग दिल्यानंतर रडली, भांडली अन्…; एलिमिनेशनची भीती

पण या प्रकरणाची गंभीरता लक्षात आल्यानंतर फुरखान तिला पोलिस स्थानकात घेऊन गेला आणि तक्रार नोंदवण्यास सांगितले. ‘टाइम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार पोलिस लवकरच अदनानला बोलवू शकतात. तसेच प्रकरण न्यायालयात गेले तर अदनानवर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Tags: adnaan shaikhfirsocial media influencer
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 paddy kamble on arbaaz nikki relationship

Bigg Boss Marathi : "निक्की-अरबाजचं नातंच खोटं", पॅडी कांबळेंनी सांगितलं घरातील सत्य, म्हणाले, "किस करु का? असं आम्हाला विचारताच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.