बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे आधी मालिकेतदेखील काम करताना दिसून आहेत. तसेवज अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर लग्नगाठदेखील बांधली आहे. त्यातील एक जोडी म्हणजे समीर सोनी व निलम. समीरचा जन्म २९ सप्टेंबर १९६८ रोजी लंडनमध्ये झाला. समीर अभिनेता होण्याआधी मॉडेल म्हणून काम करत असे. तसेच बॉलिवूडमध्ये काम करण्याआधी तो दूरदर्शनवर काम करत होता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊया. समीर जेव्हा मॉडेलिंग करायचा तेव्हा त्याची ओळख राजलक्ष्मी खानविलकर बरोबर झाली होती. १९९६ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. मात्र त्यांचे हे नातं एक वर्षदेखील टिकू शकले नाही. १९९७ साली त्यांनी घटस्फोट घेतला व ते वेगळे झाले. (samir soni married life)
मॉडेलिंगमध्ये करियर करत असतानाच त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. १९९५ साली त्याने दूरदर्शनवरील ‘समंदर’ या कार्यक्रमातून अभिनयाची सुरुवात केली. मात्र हा कार्यक्रम फक्त वर्ष चालू शकला. त्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.
सर्वात आधी तो ‘चायना गेट’ या चित्रपटात दिसून आला. हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. पण त्याला जास्त प्रसिद्धी ‘बागबान’ या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन व हेमा मालीनी यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर तो ‘लज्जा’, ‘विवाह’, ‘फॅशन’, ‘मुंबई सागा’ , ‘द बिग बुल’ व ‘चेहरे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आला होता.
पहिले लग्न मोडल्यानंतर समीरचे नाव मॉडेल नफिसा जोसेफबरोबरदेखील जोडले गेले. दोघांनी साखरपुडा देखील केला. मात्र त्यांचं नातं टिकू शकलं नाही आणि साखरपुडाही मोडला. त्यानंतर समीरच्या आयुष्यात नीलम कोठारी आली. निलमचे नाव याआधी गोविंदाबरोबर जोडले गेले होते तसेच त्यांनी एकत्रित चित्रपटातही काम केले आहे. मात्र निलम व समीरने २०११ साली लग्न केले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव अहाना आहे. निलमदेखील हिंदी चित्रपटांमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.