Paaru Marathi Serial New Promo : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम व प्रियाच्या लग्नासाठी पारू,आदित्यची धडपड सुरु असलेली पाहायला मिळत आहे. प्रीतम व प्रियाचं लग्न व्हावं म्हणून आदित्य व पारू थेट प्रियाच्या गावाकडे निघून आले आहेत. पण गावाकडे ते खोटं सांगून प्रियाच्या घरात नोकर म्हणून वावरताना गेल्या काही दिवसांमध्ये दिसत आहेत. नोकर म्हणून वावरत असताना त्यांनी जराही प्रियाच्या वडिलांना भनक लागू दिलेली नाही. तर प्रियाला पळून न जाता आबासाहेबांच्या आशीर्वादाने लग्न करायचं असल्याने ती आबासाहेबांचं मन जिंकण्याच्या मागे लागल्या आहेत.
प्रिया व प्रीतमचं बोलणं हे प्रियाचा भाऊ दादा साहेबांच्या कानावर पडतं. त्यावेळेला प्रियाचा भाऊ प्रियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि सांगतो की, माझी या सगळ्याला परवानगी आहे. तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी तुला मदत करेन पण आबासाहेबांचे याबाबत काय मत असेल हे मी तुला सांगू शकत नाही. त्यामुळे तू या घरातून एका दिवसासाठी पळून जा म्हणजे तुझा साखरपुडा मोडेल. नंतर काय होईल ते आपण तेव्हाच तेव्हा पाहू”. मात्र प्रियाला हे काही मान्य नसतं. प्रिया म्हणते की, मी या घरातून गेले तर आबासाहेब कोलमडतील आणि ते मला पाहावणार नाही. त्यामुळे जे होईल त्याला मी तोंडी जायला तयार आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रियाच्या साखरपुड्याला दिवस होतो आबासाहेबांनी पाहिलेला मुलगा आणि त्याचा कुटुंब साखरपुड्यासाठी घरी येतो.
आणखी वाचा – शेवटी बापच तो! लेकींना पाहून स्वत:ला सावरु शकला नाही पॅडी, एकमेकांना घट्ट मिठी मारली तेव्हा…
प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, प्रियाच्या साखरपुड्यासाठी सगळी मंडळी आलेली असतात. तेव्हा प्रियाचा होणारा नवरा आबासाहेबांना सांगतो की, “माझ्या नावावर प्रॉपर्टी केल्याशिवाय मी हा साखरपुडा करणार नाही”. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रॉपर्टी नावावर केल्याशिवाय साखरपुडा होणार नाही यावरुन त्याचा खरा चेहरा समोर येतो. तेव्हा आबासाहेब म्हणतात की, “किती लोचट आहेस तू”. हे ऐकल्यावर तो आणखीनच रागावतो आणि सांगतो की, “मी हिच्याशी असंच लग्न करणार नाही. तुम्हाला माझ्या नावावर काहीतरी करुन द्यावच लागेल. काही द्यायचंच नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न तुमच्या नोकराबरोबर लावून द्या”.असं म्हणत तो मुलगा त्याच्या कुटुंबाबरोबर निघून जातो.
आबासाहेबांच्या मनाला हे खूप लागतं त्यानंतर आबासाहेब प्रीतम जवळ जातात आणि त्याला विचारतात, “नंदी जर माझ्या मुलीची तयारी असेल तर तू माझ्या मुलीशी लग्न करायला तयार आहेस का?”, असं म्हणत प्रियाबाबत प्रीतम जवळ लग्नाची मागणीच घालतात. एका दृष्टिकोनातून प्रिया-प्रीतममधील प्रेमातील मोठा अडथळा दूर झालेला असतो. त्यामुळे आता आबासाहेबांनी मागणी घातल्यानंतर प्रिया व प्रीतम लग्नाला तयार होणार का?, अहिल्यादेवीचा मुलगा असल्याचं सत्य आबा साहेबांसमोर येणार का?, हे सारं पाहणं मालिकेत रंजले ठरणार आहे.