शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : पॅडीसाठी मराठी इंडस्ट्रीमधून फुल्ल सपोर्ट, सुप्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाले, “दिलदार माणूस…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 26, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Jaywant Wadkar supports Paddy Kamble

मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी पॅडी कांबळेंना पाठींबा देत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सीझन केवळ ७० दिवसांत संपणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यासाठी स्पर्धकांमध्ये  चढाओढ पहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चे पाचव्या सीझनमधील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा झालेली पाहायला मिळाली. या घरातील प्रत्येक स्पर्धकांना त्यांच्या चाहत्यांचा व प्रेक्षकॅनचा तुफान प्रतिसाद मिळाला. अशातच आता हा शो अंतिम टप्प्यात आला आहे. (Jaywant Wadkar supports Paddy Kamble)

त्यामुळे आपला आवडता स्पर्धक अंतिम टप्प्यात जावा यासाठी स्पर्धकांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. अशातच या घरातील पॅडी कांबळेंसाठी मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी पॅडीला पाठींबा देत तो या पर्वाच्या टॉप ३मध्ये जावा अशी इच्छाही त्यांनी या व्हिडीओमध्ये व्यक्त केली आहे. जयवंत वाडकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ढोल वाजत असून हा ढोल पॅडी यांना शुभेच्छा देण्यासाठी वाजत असल्याचे वाडकरांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Paddy Kamble (@paddykamble)

तसंच पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “पॅडी तुला खूप साऱ्या शुभेच्छा यार… तू एक दिलदार माणूस आहेस. तितकाच हुशार अभिनेताही आहेस. तुझ्याबदल काय सांगू… तुला वाजवता येतं, तुला नाचता येतं. गाता येतं, कॉमेडी करतोस. तितकीच गंभीर भूमिकाही तू उत्तम करतोस. यापेक्षा अजून काय सांगू. तुझ्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. तुझ्याकडे टायमिंग (व्यक्तशीरपणा) खूप आहे. ‘आजीबाई जोरात’च्या निमित्ताने निर्मिती सावंतकडून तुझे अनेक किस्से ऐकतो’.

आणखी वाचा – अ‍ॅक्शन, रोमान्स आणि ड्रामा… या वीकेण्डला ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, नक्की काय पाहायचं? वाचा संपूर्ण यादी

यापुढे जयवंत वाडकरांनी एक किस्सा सांगताना असं म्हटलं आहे की, “आपला ‘वऱ्हाड वाजंत्री’ हा चित्रपट करताना तुला सर्दी झाली होती आणि त्याची एक अनोखी नक्कल तुला करायची होती. तेव्हा आम्हाला इतकं हसायला यायचं की… इतकं कमाल टायमिंग होतं तुझं. तू नेहमीच समोरच्याला वाव दिला आहेस. हे तुझं काम आहे आणि ते तू करत आहेस, हे खरच खूप ग्रेट आहे. तुला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. पॅडी, तू ‘टॉप ३’मध्ये नक्कीच असणार आहेस”.

आणखी वाचा –  Bigg Boss Marathi 5 : शाळेची फी भरण्यासाठी वडील विकायचे स्वतःचं रक्त, जान्हवी सांगितली माहेरची सत्य परिस्थिती, म्हणाली, “इतकं कमावायचं आहे की…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आता अगदी रंजक वळणावर आलं आहे. दोन आठवड्यांमध्ये हा आवडता शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर कोण राज्य करणार आणि या पर्वाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: bigg boss marathi 5jaywant wadkarpaddy kamble
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Nikhil Bane shared village video

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने दाखवलं चिपळूणमधील त्याचं गाव, इतकं सुंदर व निसर्गरम्य वातावरण पाहून चाहतेही भारावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.