‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पाहिला जाणारा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या शोमुळे अनेक नोवोदित कलाकारांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली असून त्या कलाकारांनीसुद्धा या संधीचं सोनं केलं आहे. या नवोदित कलाकारांपैकी एक लोकप्रिय कलाकार म्हणजे निखिल बने. आपल्या विनोदाचं अचूक टायमिंग साधत अनेक वर्षे निखिल प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचबरोबर त्याने अनेक चित्रपटांमध्येही विनोदी भूमिका साकारल्या आहेत. निखिलचं स्वतःचं युट्युब चॅनल आहेच पण त्याचबरोबर तो इन्स्टाग्रामवरदेखील अनेक रील व्हिडीओ शेअर करत असतो. (Nikhil Bane Kokan Reel Video)
निखिल बनेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाद्वारे निखिल नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. विशेषतः गावाकडच्या आठवणीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो आणि त्याच्या या रील व्हिडीओला चाहत्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळतो. अशातच त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याद्वारे त्याने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा कोकणची खास सफर घडवून आणली आहे.
निखिल बने नुकताच कोकणात गणेशोत्सवासाठी गेला होता आणि याचे क्षण त्याने सोशल मीडियावर शेअरही केले होते. अशातच त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामधून त्याने गावाची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये हिरवीगार शेतं, कौलारू घरे, गावची मातीची पायवाट, कोकणातील लालपरी म्हणजेच एसटी. निखिलने हा व्हिडीओ शेअर करत ‘गाव माझे’ असं म्हटलं आहे. तसंच या व्हिडीओलाअ त्याने गांव माझे हे गाणेदेखील लावले आहे. निखिलने शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : क्रुझवर लीला प्रेमाची कबुली देणार, ऐजेंबरोबरचं प्रेम आणखीनच बहरणार, डान्स, प्रपोझ अन्…
दरम्यान, निखिलच्या अनेक चाहत्यांनी व प्रत्येक कोकणी माणसाने या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “खूपच छान”, “मला तुझे व्हिडीओ खूप आवडतात”, “कोकण म्हणजे एक स्वर्गचं आहे”, “गावची आठवण करुन दिलीस भावा”, “कोकणात गावाला जायची मजा काही वेगळीच”, येवा कोकण आपलोच असा” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला तुफान प्रतिसाद दिला आहे.