आयुष्यात सोबत असणारी माणसं कधी चांगला तर कधी वाईट अनुभव देऊन जातात. माणसांबाबत आलेला हा अनुभव शेअर केला आहे अभिनेत्री मानसी नाईक हिने. मानसी आणि तिच्या नवऱ्या सोबतच्या नात्यावर आतापर्यंत तिने बऱ्याच वेळा भाष्य केलं आहे. मानसीने तिच्या फेसबुक अकाउंट वरून शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हणल आहे.(Mansi Naik Post Viral)
” ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी अर्थात या पासिंग फेजेस असतात…
हे देखील वाचा – आणि खांद्यावरच्या माकडाने अशोक सराफ यांना सणसणीत टपली मारली
माणसाचं असत्य रूप आपल्याला माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते खोटंनाटं उलटंपालटं बोलून वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात मग तर त्यांची कीव येते.

अक्षरशः का वागत असतील माणसं अशी स्वतःसह इतरांना का फसवत असतील ज्यांच्याशी अगदी पटतच नाही त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं कटुता आणून खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं तितकी सहजता आपल्यात असावी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होताना…”
मानसीने शेअर केलेला अनुभव तिच्या आणि परदीपच्या नात्याबद्दल आहे का असा प्रश्न हे प्रेक्षकांनी विचारला आहे.