रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : सांगकाम्यांना टास्क पडणार भारी, निक्की-वर्षाची दादागीरी सुरु, ऑर्डर ऐकून जान्हवीला रडूही आलं अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 25, 2024 | 11:57 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 new promo

'बिग बॉस'च्या घरात ऑर्डर वर ऑर्डर सुटणार आणि सांगकाम्यांनवर हा टास्क भारी पडणार

Bigg Boss Marathi Season 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांना अनपेक्षित टास्कचा सामना हा करावा लागतो. यंदाचं ‘बिग बॉस मराठी’चं पर्व विविधांगी टास्कमुळे विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात तब्बल १६ स्पर्धक आणि एक वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी एंट्री घेतली. आता ‘बिग बॉस मराठी’चे काही दिवस शिल्लक असताना एकूण आठ स्पर्धक चुरशीची लढाई देताना दिसत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस’ने या आठवड्यात आठहीच्या आठ स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे आता स्पर्धकांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळत आहे.

अरबाज पटेल हा शेवटचा कॅप्टन झाला आणि त्याच्या एक्झिटनंतर ‘बिग बॉसच्या घरात कुणीच कॅप्टन नाही आणि यामुळे घरात कामावरुन अनेकदा वाद होताना दिसत आहेत. यावर आता ‘बिग बॉस’ यांनी तोडगा काढला असल्याचं पाहायला मिळत आहे. घरात कॅप्टन होऊन कामे वाटली जावी यासाठी बिग बॉस कडून एक नवीन टास्क देण्यात आला. सांगकामे आणि मालक असं या नवीन टास्कचे नाव असून या टास्कमध्ये जिंकणारी टीम ही मालक असणार आहे आणि पराजित होणारी टीम सांगकामे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “चुका मान्य केलेल्या तरीही…”, जान्हवी किल्लेकरचा खेळ पाहून तिच्या जाऊबाईंचा फुल्ल सपोर्ट, म्हणाली, “तिला टार्गेट करुन…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यात एक टीम अंकिता, पॅडी, अभिजीत आणि जान्हवी अशी आहे तर दुसरी टीम, डीपी, सूरज, वर्षा व निक्की अशी आहे. लगोरी टास्कमध्ये एकीकडे अंकिता वर्षा यांना खाली ढकलून देताना तसेच जमिनीवर खेचताना दिसली. या लगोरी टास्कमध्ये पहिल्या दोन फेऱ्या झाल्या त्यात एकाही टीमला बाजी मारता आली नाही. मात्र उर्वरित दोन फेऱ्यांमध्ये दुसऱ्या टीमने बाजी मारलेली दिसली. त्यामुळे डीपी, सूरज, वर्षा व निक्की हे मालक झाले तर अंकिता, पॅडी, अभिजीत आणि जान्हवी हे सांगकाम्या झाले.

आणखी वाचा – “आपली कला ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचावी पण…”, ‘लापता लेडीज’ने ऑस्करमध्ये धाव घेतल्यानंतर छाया कदम यांची पोस्ट, म्हणाल्या, “आनंद आहे की…”

नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, यामध्ये सांगकामे मालकांची सेवा करताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये सुरुवातीला निक्की असं बोलताना दिसतेय की, “चला ड्युटीला लागा सांगकाम्या”. त्यानंतर अंकिता व जान्हवी वर्षा ताईंचे पाय दाबताना दिसत आहेत. यावेळी वर्षा ताई माझा पाय व्यवस्थित दाबा असं सांगताना दिसत आहेत. तर जान्हवीच्या हाताला लागलेलं असतानाही ती डाव्या हाताने पीठ मळताना दिसतेय. तर इकडे डीपी देखील मला चहा हवाय अशी फर्माईश करताना दिसत आहे. तर एकीकडे निक्कीने अभिजीतला कामाला लावलेलं पाहायला मिळत आहे. तर जान्हवी वर्षा ताईचं पेडिक्युअर करतानाही दिसतेय, ही काम करुन जान्हवीला रडूही आलेलं पाहायला मिळत आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 new task Nikki Tamboli team won and Varsha Usgoankar, Suraj Chavan and DP Powar become owners.

Bigg Boss Marathi 5 च्या घरात वर्षा व निक्की झाल्या मालक, अभिजीत, अंकिता व जान्हवीला नको ती कामे सांगितली अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.