‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘भाऊचा धक्का’मध्ये प्रेक्षकांबरोबरचं स्पर्धकांनादेखील मोठा धक्का मिळाला होता. तो धक्का म्हणजे एकाच वेळी दोन स्पर्धकांचे झालेले एलिमिनेशन. ‘बिग बॉस’च्या घरातील निखिल दामलेचा प्रवास संपला आणि त्यापाठोपाठ मराठमोळी अभिनेत्री योगिता चव्हाणचा या घरातील प्रवासही संपला. कॅप्टन्सी टास्कदरम्यान योगिताने सह स्पर्धकांना आपला जलवा दाखवत उत्तम खेळ खेळला. टीम बी मध्ये योगिता असून ती तिच्या टीमसाठी लढा देताना दिसली. मात्र घरात मानसिक त्रास होत असल्याचे कारण देत योगिताने घराबाहेर पडायचे असल्याची विनंती बिग बॉसकडे केली. (Arya Jadhav Meet Yogita Chavan)
‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर आता योगिता आणि आणखी एका ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकाची भेट झाल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’च्या घरातून आर्या जाधव या स्पर्धकाचा प्रवास संपलेला पाहायला मिळाला. कॅप्टनसी ‘जादुई दिव्या’च्या टास्क दरम्यान निक्की व आर्यामध्ये झालेल्या बाचाबाचीत आर्याने निक्कीच्या कानाखाली लगावली. यावर निक्कीने ‘बिग बॉस’ कडे न्यायाची मागणी केली. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरात कोणत्याही स्पर्धकाला मारहाणी करणे व शारीरिक इजा पोहोचवणं हे नियमांचे उल्लंघन असल्याचे कारण देत ‘बिग बॉस’ने आर्याची चांगलीच कान उघडणी केली.
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनेही आर्याची चांगलीच शाळा घेतलेली पाहायला मिळाली. त्यानंतर या चुकीची शिक्षा म्हणून ‘बिग बॉस’ने आर्याला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला. आर्या सध्या घराबाहेर पडली असून आता आर्याने ‘बिग बॉस’च्या घरातील तिची जिवलग मैत्रिणी योगिता चव्हाणची भेट घेतली असल्याच समोर आलं आहे. योगिता व आर्या हे टीम बी मधून खेळताना दिसले आणि ‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला.
एकमेकींना साथ देत एकमेकींना समजून घेत दोघी घरात खेळताना दिसल्या. मात्र योगिताचा प्रवास हा ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला संपला. आता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर योगिता व आर्या यांनी अखेर एकमेकींची भेट घेतली असल्याचे पाहायला मिळत आहेत. आर्या मुंबईला आली तेव्हा ती योगिताच्या घरी तिला भेटायला गेली असल्याच दिसत आहे. घरात येताच योगिताने आर्याला घट्ट अशी मिठी मारलेली दिसली. आर्या योगिताला मी तुला खूप मिस केलं असं बोलताना दिसली. एकमेकींना भेटून दोघींनाही खूप आनंद झाला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.