Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व विशेष चर्चेत राहिलेले पाहायला मिळाले. यंदाच्या या पर्वात सर्वच स्पर्धक मंडळींनी तुफान राडे केलेले दिसले. सध्या घरात निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, संग्राम चौघुले हे स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या पर्वात आठव्या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा अरबाज पटेल कॅप्टन पदाचा मानकरी ठरला. तर या आठवड्यात वर्षा यांनी टीम या मधून एक्झिट घेतली. एकूणच आयत्या वेळी गेम पलटला असून आता ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आज शनिवार असून दर शनिवारी प्रेक्षक मंडळी भाऊच्या धक्क्याची वाट पाहत असतात. त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशातच आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे. मात्र या आठवड्यात भाऊचा धक्का नाही तर महाराष्ट्राचा धक्का होणार असून यावेळी स्पर्धक मंडळींना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, पत्रकारांनी स्पर्धकांना थेट प्रश्न विचारले आहेत. डीपीला असा प्रश्न विचारण्यात आला की “तुम्हाला अभिजीतचा इश्यू आहे का?”. त्यानंतर अरबाजला त्याच्या व निक्कीच्या नात्यावरुन “शो संपल्यानंतर निक्कीशी नातं तसंच राहणार का?” असा प्रश्न विचारण्यात येतो. तर “जान्हवीला तिच्याकडून काय चुकलं” असं विचारण्यात येतं. तसेच सूरजला “तू गेम कधी दाखवणार”, असा सवाल करण्यात आला. त्यानंतर निक्कीला अरबाजबद्दल प्रश्न केला जातो. “तुला असं वाटतंय का की अरबाज आता घरातून जाईल आणि आता त्यानंतर आपल्याला दुसरा साथीदार पाहिजे” या सर्व प्रश्नांची उत्तरं हे स्पर्धक काय देतात? ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – 21 September Horoscope : मेष, सिंह व कन्या राशीच्या लोकांची व्यवसायात होणार प्रगती, शनिवारचा दिवस नेमका कसा?
दरम्यान, सदर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत प्रश्नांचा भडीमार केला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा हा प्रोमो पाहून “निक्की-अरबाजला दत्तक घेतलंय का?” असा प्रश्न बिग बॉसला विचारा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत.