Abdu Rozik Marriage : ‘बिग बॉस १६’ या शोमुळे तजाकिस्ताचा गायक अब्दू रोजिक प्रसिद्धीझोतात आला. त्याची फॅन फॉलोविंगही तगडी आहे. अब्दू रोजिक हा ‘हिंदी बिग बॉस मध्ये तो धमाका करताना दिसला. अब्दू रोजिक ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची भारतामधील फॅन फॉलोइंगही चांगलीच वाढली असल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉस हिंदी मुळे चर्चेत आलेला अब्दू काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आला होता. ‘बिग बॉस १६’ फेम अब्दू रोजिक लग्न करणार होता. ०७ जुलै रोजी त्यांचे लग्न होणार होते. पण काही कारणाने त्याचे हे लग्न पुढे ढकलले गेल्याचे म्हटलं गेलं. (Abdu Rozik Marriage Brokeup)
अब्दूने त्याच्या साखरपुड्याचे काही खास फोटोही सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. मात्र आता त्याचे हे लग्न मोडलं आहे. याबद्दल त्याने ‘ई-टाइम्स’शी संवाद साधला आणि या संवादात त्याने त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी अब्दूने सांगितले की, त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्याच्यासाठी खूप महत्वाचे नाते होते. पण सांस्कृतिक भिन्नतेमुळे त्यांना त्यांच्या नात्याला पुढे घेऊन जाणे कठीण झाले. त्याचबरोबर त्याच्यासाठी हे नाते तोडणे अजिबात सोपे नव्हते.
याबद्दल अब्दू असं म्हणाला की, “’आमचे नाते जसजसे विकसित होत होते, तसतसे सांस्कृतिक फरक दिसून येत होते. त्यामुळे आम्हाला लग्नाबद्दल निर्णय बदलावा लागला. माझ्या आयुष्यात मला दररोज किती अडचणी येतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर असणारा आणि पुढच्या प्रवासात त्याला साथ देणारा जोडीदार हवा. मला खात्री आहे की योग्य वेळ आल्यावर मला पुन्हा प्रेम मिळेल. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी मी सर्वांचे आभार मानतो”.
दरम्यान, अब्दू रोजिकने एप्रिलमध्ये शारजाह, दुबईमध्ये अमीराबरोबर साखरपुडा केला होता. २४ एप्रिल २०२४ रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. २० वर्षांचा अब्दू ०७ जुलै रोजी अमीरातीबरोबर लग्न करणार होता. पण बॉक्सिंगच्या सामन्यामुळे हे लग्न पुढे ढकलले गेले . तरीही तो सामना हरला आणि अशातच आता त्याचे लग्नही मोडले आहे.