Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आर्या जाधवला घराबाहेर काढलं आहे. निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्याला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कॅप्टन्सी कार्यामध्ये आर्याने संयम सोडून निक्कीवर हिंसेचा प्रयोग केला. यानंतर ‘बिग बॉस’ने घरातील नियम मोडल्यामुळे आर्याला घराबाहेर काढलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर आर्याने निक्कीला ‘मी तुला मारीन’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला. (Aarya Jadhao Emotional)
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आर्या जाधव ही अमरावती शहरात दाखल झालीये. यावेळी आर्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. आर्याला भेटण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. आर्याने रॅप करत आपली एक झलक दाखवली व रॅली काढून तिचे अमरावतीकरांनी जोरदार स्वागत केले. सोशल मीडियावर याचेच अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी रॅपरची आई तिला बघून खूपच भावुक झाली होती. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर येताच आर्याला घरात वाईल्ड कार्ड म्हणून बोलावले जावे अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या होत्या. ती पुन्हा या घरात व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि याच तिच्या या घरातील वाइल्ड कार्ड एन्ट्रीबद्दल नेटकऱ्यांनी तिला शनिवारच्या इन्स्टाग्राम लाईव्हमध्येही विचारलं होतं.
यावेळी आर्याने नेटकऱ्यांच्या ‘वाइल्ड कार्ड म्हणून पुन्हा येणार का?’ या प्रश्नावर आर्या तुमची इच्छा असेल तर होईल” असं उत्तर दिलं होतं. अशातच आर्याने अमरावतीमध्ये हजेरी लावल्यानंतरही उपस्थित अनेक चाहत्यांनी तिला वाइल्ड कार्ड एन्ट्रीबाबत विचारले. तेव्हाही आर्याने चाहत्यांनाच प्रश्न विचारत “तुम्हाला वाइल्ड कार्ड म्हणून मी यायला हवी आहे का?” असं म्हणाली. तसंच यावेळी आर्या आपल्या आईला भेटून खूपच भावुक झाली. दोघी एकमेकींना मिठी मारत भावुक झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss कडून घरातील गॅस वापरण्यासाठी मोजकाच वेळ, तारांबळ उडताच निक्की-वर्षा यांच्यामध्ये वाद पेटला कारण…
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा परतणार की नाही? याबद्दल अनेल चाहत्यांना साशंकता आहे. तिचे अनेक चाहते मंडळी तिला या घरात वाइल्ड कार्ड म्हणून पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आर्याने पुन्हा एन्ट्री करावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा असली तरीही ती या घरात येणारकी नाही हे येणरा काळच सांगेल.