रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अभ्युदय नगरच्या गणपतीला कुटुंबासह आरतीला पोहोचले आदेश बांदेकर, चाळीतील जुन्या दिवसांची आठवण

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 17, 2024 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
मुंबईतील अभ्युदय नगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्याचा व्हिडीओ आदेश बांदेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबईतील अभ्युदय नगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्याचा व्हिडीओ आदेश बांदेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून “दार उघड बये दार उघड” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते, निवेदक म्हणजे आदेश बांदेकर. आदेश बांदेकर हे मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. मनोरंजन क्षेत्राबरोबरच राजकारणातही त्यांचा वावर आहे. त्यामुळे अनेक माणसे त्यांनी जोडली आहेत. यात त्यांच्या अनेक ओळखीही झाल्या आहेत. याच ओळखीतून अनेकजण आदेश यांना काही ठिकाणी बोलवत असतात आणि बांदेकर आवर्जून भेटीही देत असतात. (Aadesh Bandekar Ganeshotsav Mandal)

आदेश बांदेकर हे मनोरंजन, राजकारणात तर सक्रीय आहेतच. पण ते सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपल्या अनेक दैनंदीन गोष्टी व कामानिमित्तची माहिती शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बांदेकरांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील अभ्युदय नगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्याचा व्हिडीओ आदेश बांदेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “यावेळी अरबाज घराबाहेर जाऊ शकतो”, अभिजीतचं ‘ते’ विधान चर्चेत, म्हणाला, “टास्कपुरता खेळतो आणि…”

आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये फक्त तेच नाहीत तर त्यांची पत्नी सूचित्रा बांदेकर व मुलगा सोहम बांदेकरही पाहायला मिळत आहे. आदेश बांदेकरांनी सपत्नीक या गणपती मंडळात आरती केली असून याचे खास क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. “अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ … घालिन लोटांगण वंदिन चरण” असं म्हणत आदेश बांदेकरांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभ्युदय नगरमध्ये आदेश बांदेकरांचे बालपण गेले असून या गणपती मंडळाला त्यांनी आवर्जून भेट दिल्यानिमित्त त्यांचे कौतूक होत आहे. आदेश यांनी बाप्पा चरणी आपली सेवा अर्पण केल्यानंतर आशीर्वादही घेतले.

आणखी वाचा – प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सनच्या मोठ्या भावाचे निधन, हृदयविकाराचा झटका आल्याने गमावला जीव, कुटुंबावर दु:खाचा डोंगर   

दरम्यान, आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत तूफान प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी आदेश बांदेकरांच्या या साधेपणाचेदेखील कमेंट्सद्वारे कौतूक केलं आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आदेश बांदेकरांनी हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.    

Tags: Aadesh BandekarAadesh Bandekar Abhyuday Nagar Ganeshotsav Mandal VisitAadesh Bandekar Ganpati Aarti
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
dalljiet kaur instagram story

दलजीत कौरच्या दुसऱ्या पतीचा साखरपुडा?, फोटो पाहून भडकली अभिनेत्री, म्हणाली, "त्याची अजून एक पत्नी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.