झी मराठी वहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. या ‘सारेगमप’मुळे कार्तिकीला खूप लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील तिचं ‘घागर घेऊन’ हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. या कार्यक्रमाची विजेती गायिका कार्तिकी ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडने काही महिन्यांपूर्वी गुडन्युज दिली. लग्नानंतर चार वर्षांनी कार्तिकीने मे महिन्यात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या बाळाची गुडन्यूज दिली आहे. (Kartiki Gaikwad Singing)
२०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी आई झाली आहे. ‘Its Baby Boy’ गोंडस बाळाच्या आगमानाने मी खूपच आनंदी आहे. अशी पोस्ट लिहीत तिने आई झाल्याची बातमी आपल्या चहात्यांबरोबर शेअर केली होती. आई झाल्यानंतर कार्तिकी आता पुन्हा आपल्या कमावर रुजू झाली आहे. कार्तिकी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक गायनाचे व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच तिने पुण्यातील एके ठिकाणी गायनसेवा केली असून याचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कार्तिकीने पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातील गणपतीसाठी गायनसेवा केली. याचनिमित्ताने कार्तिकीने एक पोस्ट केली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी येथे गायनसेवा सादर करुन खूप दिवसांनी पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात केली आहे” असं म्हटलं आहे. सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.
‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. गरोदरपणात आणि त्यानंतर आई होताच गायिका काही काळ कार्यक्रम करत नव्हती. मात्र आताअ कार्तिकी पुन्हा एकदा तिच्याअ गायनसेवेसाठी रुजू झाली असून यानिमित्ताने तिने पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान. या गायनसेवेला श्रोत्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे