बॉलिवूडमधील गोविंदा हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या आहेत. त्याचा विनोदी अंदाज हा नेहमी प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. मात्र सध्या तो अभिनयापासून दूर असलेला पाहायला मिळतो. आजवर त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक खुलासे झाले आहेत. त्याने सुनीताबरोबर लग्नगांठ बांधली. त्याचे लग्न झाले तेव्हा त्याबद्दल त्याने खूप दिवस कोणासमोरही याबद्दलचा खुलासा केला नव्हता. मात्र काही वर्षांनी त्यांचे नातं प्रकाशझोतात आले. त्याला टीना व यशवर्धन अशी दोन मुलं आहेत. मात्र त्याला तीन मुलं असण्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. (govinda second daughter died)
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा ‘टाइमआऊट विथ अंकित’ या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिली होती. यावेळी तिने मुलांबद्दल भाष्य केले आहे. यावेळी सुनीताने सांगितले की त्यांना दोन नाही तर तीन मुलं होती. मात्र दुसऱ्या मुलीला गमावलं आहे. तसेच मुलगा यशचेदेखील अधिक लाड केले जातात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुनीता यांनी सांगितले की, “यशला जास्त प्रेम मिळालं आहे. तो टीनापेक्षा आठ वर्ष लहान आहे. यशच्या आधी आम्हाला एक मुलगीदेखील झाली होती. मात्र तिचा तीन महिन्याची असतानाच मृत्यू झाला. मुलीच्या फुफ्फुसांची योग्य वाढ झाली नव्हती त्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे आम्ही यशचा सांभाळ खूप प्रेमाने केला आहे. त्याचा सांभाळ करताना मला खूप भीती वाटत होती. यशच्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करायच्या होत्या आणि त्या मी केल्या”.
पुढे त्या म्हणाल्या की, “मी त्या दोघांच्या बाबतीत खूप कडक आहे. पण आता दोघंही मोठे झाले आहेत. मी मुलांना शाळेत सोडायला व आणायला जात असे. मी माझ्या मुलांना नोकरांकडे कधीही सोडत नव्हते”. दरम्यान त्यांनी गोविंदा यांच्याबरोबरच्या अफेअरबद्दलही सांगितले. त्यांनी सांगितले की, “त्यावेळी आमचे अफेअर नव्हते. त्यावेळी ते बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत होते. आम्ही विचारदेखील केला नव्हता की आम्ही प्रेमात पडू आणि आमचं लग्नदेखील होईल असा”. गोविंदा अभिनयापासून दूर असला तरीही तो हल्ली सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतो.