Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नियमभंग केल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर आर्याने निक्कीला ‘मी तुला मारीन’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला आहे. घरातील इतर सदस्यांनी आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही, पण तिला तिची चूक समजावण्याचा प्रयत्न केला. (Pushkar Jog supports Aarya Jadhav)
यानंतर आर्याला तिची चूक समजली आणि तिने निक्की, ‘बिग बॉस’सह महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. यानंतर ‘बिग बॉस’ने आर्याला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर ‘बिग बॉस’ने अंतिम निर्णय जाहीर करत आर्याला घराबाहेर काढलं. आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना अमान्य आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आर्याने नियमभंग केला असला, तरी अनेक नेटकरी आर्याच्या पाठिशी उभे असल्याचं दिसत आहे. नेटकऱ्यांबरोबरचं सुप्रसिद्ध अभिनेता व ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धकही आर्याला पाठींबा देत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून आर्या जाधव घराबाहेर, ‘ती’ चूक महागात पडली अन्…; निर्णय योग्य की अयोग्य?
अभिनेता पुष्कर जोगने आर्याला पाठींबा देत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मी आर्या जाधवच्या पाठीशी उभा आहे. माझे हृदय आर्यासाठी तुटत आहे. ती चुकीची होती हे मला मान्य आहे, पण निक्कीचे गेल्या सहा आठवड्यामधील अमानुष, विषारी वागणे तितकेच भयानक आहे. निक्कीची भाषा आणि तिचा प्रत्येकाचा अनादर करण्याचा स्वभावसुद्धा शिक्षेस पात्र आहे”. त्यामुळे आर्याला घराबाहेर काढण्याचा ‘बिग बॉस’चा निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाहीचं पण तो काही कलाकारांना व माजी स्पर्धकांनाही पटलेला नाही असे दिसून येत आहे. ‘बिग बॉस मराठी’चे अनेक प्रेक्षक व आर्याचे चाहते या निर्णयाच्या विरोधात आहेत.
दरम्यान, दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना बिग बॉसने “कॅप्टन्सी कार्यातलं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आर्या निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली. निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि त्यानंतर आर्याने हात उचलला. आर्याने केलंल कृत्य बिग बॉसच्या मुलभूत नियमांचं उल्लंघन आहे. बिग बॉसच्या घरात या हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही” असं म्हणत बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे.