शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : प्रिया-प्रीतमच्या प्रेमाचं सत्य येणार का तिच्या भावासमोर?, एकमेकांना रंगे हात पकडलं अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 13, 2024 | 1:07 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update update

प्रिया-प्रीतमच्या प्रेमाचा खुलासा होणार का?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे पारू व आदित्यने आबासाहेबांचे मन जिंकलेलं असतं. प्रियाच्या वडिलांचे मन जिंकून प्रीतमचा हात मागण्याचा त्यांचा हेतू लवकरच पूर्ण होणार असतो. प्रियाच्या घरी गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असते. तेव्हा रीतीनुसार नवऱ्याला सुगंधी तेल लावत त्याला तेलाने मालिश करण्याची पद्धत असते. त्यामुळे मावशींच्या सांगण्यानुसार पारू आदित्यला तेलाने मालिश करायला जाते. तेव्हा आदित्य लाजत असतो त्यावेळेला मावशी म्हणतात की, ही एक रीतच आहे आणि ती पूर्ण करावीच लागेल.  (Paaru Serial Update)

शिवाय गणपतीची पूजा ही पारू व आदित्यला करायची असते त्यामुळे त्यांच्यावर खूप मोठं दडपण आलेलं असतं. मावशींच्या सांगण्यावरुन पारू आदित्यला मालिश करुन देत असते. तर इकडे प्रीतमलाही प्रिया मॅडमकडून मालिश करुन घ्यायची असते कारण बायकोने पतीची सेवा करणं ही रीत असते, त्यामुळे प्रीतमची ही इच्छा असते त्यानुसार प्रिया मॅडम ही प्रीतमच्या समोर येतात आणि त्याला मालिश करु लागतात. तितक्यात तिथं आबासाहेब प्रीतमला आणि पारूला शोधत शोधत आलेले असतात ते गच्चीवर येतात आणि खाली पाहतात तर तिथं प्रिया मॅडम उभ्या असतात आणि पारू, आदित्य व प्रीतम एका बाजूला लपलेले असतात.

आणखी वाचा – “गांव कधी बघतोय असं झालंय”, गावच्या आठवणीत सूरज चव्हाण भावुक, मन मोकळं करत म्हणाला, “स्वतःवर नियंत्रण…”

प्रिया मॅडमना पारू सांगते की, तुम्ही फक्त हावभाव करा मी माझ्या आवाजात बोलते. तेव्हा पारू सांगते की ते सामानाला बाहेर गेलेत आले की पाठवते, असं बोलते. तेव्हा आबासाहेब चालेल असं म्हणून तिथून निघून जातात. त्यानंतर प्रिया मॅडम रितीनुसार होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच प्रीतमला मालिश करतात. हे सगळं सुरु असताना एकीकडे किर्लोस्कर बंगल्यात दिशाची धावपळ सुरु असते की, पारू, आदित्य, प्रीतम नेमके कुठे गेले आहेत त्याचा शोध घ्यावाच लागेल आणि त्यानुसार ती त्यांच्या मागावरच असते. दामिनी आणि दिशा मिळून प्लॅनही तयार करत असतात.

आणखी वाचा – धक्काबुक्की केली, फोनही हिसकावला अन्…; लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आला वाईट अनुभव, व्हिडीओ व्हायरल

तर इकडे प्रिया आणि तिचा भाऊ गणेशोत्सवाची तयारी करत असतात. यावेळी प्रिया खूप सुंदर नटलेली असते हे पाहून प्रीतमला रहावत नाही तो प्रियाला खाणाखुणा करु लागतो. तेव्हा प्रिया त्याला शांत राहायला सांगते त्यानंतर प्रियाच्या भावाचं लक्ष जाऊ नये म्हणून प्रीतम लपतो मात्र प्रियाचा भाऊ शेवटी प्रीतमला पाहतोच. आता प्रीतम आणि प्रियाचं हे सत्य प्रियाच्या भावासमोर येणार का?, हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialpaaru marathi serialPaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 jahnavi killekar support

Bigg Boss Marathi :  जान्हवीने निक्कीला दिलं ओपन चॅलेंज, अभिनेत्रीला प्रेक्षकांचा फुल्ल सपोर्ट, म्हणाले, "लायकी काढ आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.