दीपिका पदुकोण लवकरच तिच्या आयुष्यातील एका नव्या टप्प्यात पाऊल ठेवणार आहे. ज्या महिन्यात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्याच महिन्यात अभिनेत्री आणि तिचा पती रणवीर सिंग त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. गरोदरपणाचे दिवस एन्जॉय करत असलेल्या दीपिका पदुकोणने काही दिवसांपूर्वी तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिचा बेबी बंप पाहिल्यानंतर काही नेटकरी अभिनेत्री जुळ्या मुलांना जन्म देईल असा अंदाजही लावत होते. (Deepika Padukone Troll)
आता अलीकडेच गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगसह सिद्धिविनायकाच्या आशीर्वादासाठी पोहोचली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिका पदुकोण व रणवीर सिंग कोणत्याही मोठ्या दिवसाआधी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच भेट देतात. आजपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने अनेक कलाकारही आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करताना दिसले. गणेश चतुर्थीच्या दिवशी दीपिका पदुकोणही पती रणवीर सिंगसह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यादरम्यान दीपिका साध्या हिरव्या व सोनेरी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती, तर रणवीर सिंगही ऑफ व्हाइट रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये डॅशिंग दिसत होता. दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रणवीर दीपिकाची विशेष काळजी घेतानाही दिसला. रणवीर-दीपिकाचा मराठमोळा लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला असला तरी अनेक नेटकऱ्यांनी दीपिकाने भारतीय संस्कृती जोपासली नाही म्हणून तिला चांगलंच ट्रोल केलं. यावेळी दीपिकाने पारंपरिक लूक केला मात्र गळ्यात मंगळसूत्र व कपाळी शेंदूर न लावल्याने ती नेटकऱ्यांच्या तावडीत अडकली.
हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. अनेक युजर्सनी तर कमेंट केली की, “गळ्यात मंगळसूत्र असतं तर अधिक सुंदर दिसली असती”, “मंगळसूत्र घालायला हवं होतं”, “लग्न झाल्यावर कपाळी शेंदूर हवं होतं”, अशा अनेक कमेंट तिला ट्रोल केलं आहे.