रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना गळ्यात मंगळसूत्र, ना कपाळाला टिकली; दर्शनासाठी आलेल्या दीपिका पदुकोणचा लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 14, 2024 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deepika Padukone Troll

दीपिका पदुकोणचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दीपिका पदुकोण लवकरच तिच्या आयुष्यातील एका नव्या टप्प्यात पाऊल ठेवणार आहे. ज्या महिन्यात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्याच महिन्यात अभिनेत्री आणि तिचा पती रणवीर सिंग त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. गरोदरपणाचे दिवस एन्जॉय करत असलेल्या दीपिका पदुकोणने काही दिवसांपूर्वी तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिचा बेबी बंप पाहिल्यानंतर काही नेटकरी अभिनेत्री जुळ्या मुलांना जन्म देईल असा अंदाजही लावत होते. (Deepika Padukone Troll)

आता अलीकडेच गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगसह सिद्धिविनायकाच्या आशीर्वादासाठी पोहोचली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिका पदुकोण व रणवीर सिंग कोणत्याही मोठ्या दिवसाआधी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच भेट देतात. आजपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने अनेक कलाकारही आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करताना दिसले. गणेश चतुर्थीच्या दिवशी दीपिका पदुकोणही पती रणवीर सिंगसह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुम्हाला माज आलाय आणि…”, रितेश देशमुखने निक्कीला तोंडावरच फटकारलं, म्हणाला, “हवं ते बोलायचं…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यादरम्यान दीपिका साध्या हिरव्या व सोनेरी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती, तर रणवीर सिंगही ऑफ व्हाइट रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये डॅशिंग दिसत होता. दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रणवीर दीपिकाची विशेष काळजी घेतानाही दिसला. रणवीर-दीपिकाचा मराठमोळा लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला असला तरी अनेक नेटकऱ्यांनी दीपिकाने भारतीय संस्कृती जोपासली नाही म्हणून तिला चांगलंच ट्रोल केलं. यावेळी दीपिकाने पारंपरिक लूक केला मात्र गळ्यात मंगळसूत्र व कपाळी शेंदूर न लावल्याने ती नेटकऱ्यांच्या तावडीत अडकली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील डीपी दादांची आहे गावागावांत हवा, पाठींब्यासाठी गावकऱ्यांनी केली तुफान पोस्टरबाजी, म्हणाले, “सपोर्ट करायचा आणि…”

हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. अनेक युजर्सनी तर कमेंट केली की, “गळ्यात मंगळसूत्र असतं तर अधिक सुंदर दिसली असती”, “मंगळसूत्र घालायला हवं होतं”, “लग्न झाल्यावर कपाळी शेंदूर हवं होतं”, अशा अनेक कमेंट तिला ट्रोल केलं आहे.

Tags: bollywood actressDeepika Padukone Trolldipika padukone
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Devoleena Bhattacharjee ganpati festival

देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन, सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मुस्लीम असूनही...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.