Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ म्हटलं की नॉमिनेशन हे साहजिकच आलं. घरातील सदस्य स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. याचसाठी प्रत्येक स्पर्धक आपलं घरातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी इतर सदस्यांना नॉमिनेट करत असतो. अशातच आता ‘बिग बॉस मराठी ५’ चा पाचवा आठवडा सुरु आहे. मागील आठवडयात घरात एलिमिनेशन झाले नव्हतं. मात्र या आठवड्यात घरातील एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. त्यात या आठवड्यात एकूण सदस्य नॉमिनेट झाले आहेत, त्यातील सगळ्यात कमी वोट पडलेला सदस्य आज घराबाहेर जाणार आहे. (Bigg Boss Marathi 5 Nomination)
या आठवड्यात एकूण सात सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आहेत. यामध्ये आर्या जाधव, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, घन:श्याम दरवडे व धनंजय पोवार या सदस्यांचा समावेश आहे. यापैकी सूरज चव्हाण या घरचा नुकताच झालेला कॅप्टन आहे. त्यामुळे या घरातील त्याचा प्रवास संपणार नसून त्याला या आठडव्यात नॉमिनेशनपासून सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे आता घरातील एकूण सहा स्पर्धक नॉमिनेशनच्या प्रक्रियेत आहेत. यापैकी कुणाचा घरातील प्रवास संपणार यासंबंधीत एक नवीन प्रोमो समोर आला आहे.
आणखी वाचा – “रोमान्सही जमत नाही अन्…”, अमृता फडणवीसांचं पती देवेंद्र फडणवीसांबाबत वक्तव्य, म्हणाल्या, “राजकारणा शिवाय…”
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नॉमिनेशन संदर्भात एक प्रोमो शेअर करण्यात आला असून या आठवड्यात सुरक्षित सदस्याला मोदक मिळणार आहे. तर घराबाहेर जाणाऱ्या सदस्याला एलिमिनेशनचा नारळ मिळणार आहे. या नवीन प्रोमोमध्ये रितेश असं म्हणतो की, “आता होणार आहे नॉमिनेशन. ज्यांना मोदक मिळतील त्यांना मिळणार आहे मोदक तर ज्यांना नारळ मिळणार आहेत ते या घरातून एलिमिनेट होणार आहेत”. रितेशच्या या वाक्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आहे.
त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यात आताअ घरातून कोण बाहेर जाणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. या घरातून सूरज कॅप्टन झाल्यामुळे तो सुरक्षित असणार आहे. त्यामुळे आता उर्वरित सहा सदस्यांपैकी या घरातून आता कोण बाहेर जाणार? कुणाचा या घरातील प्रवास संपणार? हे उद्याच्या भाऊचा धक्कामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. बिग बॉस मराठीचे हे आगामी पाचवे नॉमिनेशन आहे.