रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुम्हाला माज आलाय आणि…”, रितेश देशमुखने निक्कीला तोंडावरच फटकारलं, म्हणाला, “हवं ते बोलायचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 7, 2024 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Daily Updates riteish deshmukh on nikki tamboli

'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख निक्की तांबोळीवर भडकला

‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्याने सोशल मीडियावर चांगलीच रंगत आणलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’मध्ये पाचवा सीझन सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात टीम ए व टीम बी मधील राडा पाहायला मिळत आहे. तर यंदाच्या पर्वात निक्की तांबोळीची अधिक चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. निक्कीचा अरेरावीपणा ‘बिग बॉसच्या घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांना खटकू लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या आठवड्यात निक्कीने विशेष त्रागा केलेला पाहायला मिळाला. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

निक्कीने घरातील कामं करण्यास स्पष्ट नकार दिला होता. किचनशिवाय कोणतीही ड्युटी करणार नाही या मतावर निक्की ठाम होती.तोंडात येईल ते बोलत सुटत निक्की तांबोळीने घरातील सदस्यांना खडेबोल सुनावले. यावेळी स्पर्धकांच्या वडिलांवरुनही निक्कीने भाष्य केलं. स्पर्धकांचा बाप काढणं हे कितपत योग्य आहे असे म्हणत निक्कीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. यावर आता रितेश देशमुखने निक्कीची शाळा घेतलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने ठाण्यात सुरु केलं स्वतःचं हॉटेल, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव, काय असणार खास?

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश यांनी निक्कीला वेगळ्या ठिकाणी बसायला लावलं. रितेश निक्कीला म्हणत आहे की, “निक्की, कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही ही अशा प्रकारची दादागिरी मी खपवून घेणार नाही. इथून पुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कधीही घराच्या कॅप्टन होणार नाही”. अर्थात भाऊच्या धक्क्यावर निक्कीला आणखी एक शिक्षा देणार असल्याचं देखील रितेशने यावेळी सांगितलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सदस्यांबरोबर विश्वासघात…”, अरबाजच्या बदलेल्या वागणुकीबद्दल अभिजीतकडून कानटोचणी, म्हणाला, “पलटी मारली…”

यानंतर समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेशने निक्कीला तिची जागा दाखवलेली पाहायला मिळत आहे. रितेशने निक्कीला सुनावत असं म्हटलं की, “निक्की ही आहे तुमची जागा. निक्की मी गेल्या आठवड्यात तुमचं कौतुक केलं. पण हे कौतुक मनात ठेवायचं असतं कारण कौतुक जेव्हा डोक्यात जातं ना तेव्हा त्याची हवा होते. आणि एकदा डोक्यात हवा गेली की आपला स्वतःवरचा ताबा सुटतो. आपल्यात माज येतो आणि मग आपण वाटेल तसे बोलायला लागतो, वाटेल तसे वागायला लागतो. आणि या आठवड्यात आपण तेच केलं”.

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi 5 daily updatesriteish deshmukh on nikki tamboli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Amruta Fadnavis said that her husband and Deputy Chief Minister Devendra Fadnavis is not romantic see the details

"रोमान्सही जमत नाही अन्…", अमृता फडणवीसांचं पती देवेंद्र फडणवीसांबाबत वक्तव्य, म्हणाल्या, "राजकारणा शिवाय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.