अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या अभिनयातील सहजतेने कायम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.मालिका, चित्रपट, वेबसिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमात तिने तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे.फ्रेशर्स या मालिकेतून मितालीला ओळख मिळाली. लाडाची मी लेक गं, या मालिका, उर्फी, हॅशटॅग प्रेम हे चित्रपट आणि सेक्स, ड्रग्स ऍड थेटर ही तिची वेब्सिरीज चांगलीच गाजली.(Mitali Mayekar Bikni Photoshoot)
अभिनयासोबतच मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर यांची लव्ह स्टोरी देखील चर्चेत आहे.प्रेक्षक देखील त्यांच्या जोडीवर भरभरून प्रेम करतात.त्यांचे अनेक फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. सध्या सिद्धार्थ आणि मिताली ट्रिप वर गेले आहेत. त्यांच्या या ट्रिपचे सर्व अपडेट ते वेळोवेळी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करत आहेत.
मितालीचं बिकनी फोटोशूट (Mitali Mayekar Bikni Photoshoot)
याच ट्रिप मधील बिकनी मधला एक फोटो मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.तिच्या या फोटोमध्ये तिच्या कॅप्शनने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.यात मितालीने लिहलं आहे, ‘आपली संस्कृती वैगेरच ज्ञान मला कमेंट सेक्शन मध्ये देऊ नका’.तर तिच्या या पोस्ट वर काहीजणांनी तीच कौतुक केलं आहे, तर काहींनी ट्रोल केलं आहे.(Mitali Mayekar Bikni Photoshoot)

मुलींनी बिकनीवरचे फोटो टाकले तर संस्कृतीला धक्का लागतो असं ज्यांना वाटत, त्या पुरुषांनी उद्यापासून धोतर घालून फिरा. अभिनेत्रींनीच संस्कृती जपायची का अशा कमेंट्स करून काही नेटकरी मितालीच्या बाजूने बोलले आहेत.
हे देखील वाचा : ‘तुझेच मी गात आहे’ मालिकेत दिसणार मंजुळाचा नवीन लूक