कलाकार कितीही प्रसिद्ध झाला , लोकप्रिय झाला आणि त्याचे पाय तरीही जमिनीवर असले तर त्या कलाकाराला प्रेक्षक आपल्या मनात स्थान देतात. प्रेक्षकांच्या मनात घर केलेला असाच एक अभिनेता म्हणजे बॉलीवूड मधील किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाह रुख खान. आपल्या समोर असणाऱ्या कलाकाराचं ऐईकून घेऊन त्यावर काम कारण शाहरुखच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितलं होत ते आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील महानायक अशोक सराफ म्हणजेच महाराष्ट्राच्या लाडक्या अशोक मामांनी.(Ashok Saraf Shah Rukh Khan)
एका प्रसिद्ध कार्यक्रमात अशोक सराफ यांना ‘ तुम्ही शाहरुख खान सोबत बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे तर त्याच्या बद्दल तुमचं काय मत आहे असं विचारण्यात आलं. तेव्हा शाहरुख खानची स्तुती करत अशोक सराफ म्हणाले अनेक कलाकारांना काही हिट चित्रपट केल्यानंतर अहंकार येतो पण शाहरुखच तस नाही तो सेट वर सगळ्यांचा ऐकून घेतो. याच एक उदाहरण ही अशोक सराफ यांनी दिल.

एकदा एका शूट दरम्यान अशोक सराफ यांनी शाहरुखला सांगितलं कि शाहरुख तू हि गोष्ट अशी करून बघ छान वाटेल तेव्हा तो लेगच अशोक सराफ यांचं ऐकायचा आणि त्याची रिहर्सल झाली असेल तरीही तो पुन्हा सगळ्यां सोबत रिहर्सल करायचा.अशोक सराफ आणि शाहरुख खान यांचं हे बॉण्डिंग असं होत हे वाचाल्यावर . सर्वत्र आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्या अनुभवाचा फायदा किंग खानला सुद्धा व्हयचा असं म्हणायला.(Ashok Saraf Shah Rukh Khan)
हे देखील वाचा – ‘काय सांगतो महेश? थांब मी बघतोच त्यांना’ रात्री २ वाजता महेश यांच्या मदतीस धावले होते बाळासाहेब
अशोक सराफ आणि शाह रुख खान यांनी करण अर्जुन, एस बॉस, कोयला, गुड्डू, आर्मी अशा अनेक चित्रपटानं मध्ये काम केलं आहे. विशेष करून अशोक सराफ आणि शाहरुख ची करण अर्जुन मधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.