कलाकार अनेकदा कथेनुसार स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असतो याच प्रयत्नात असताना कलाकाराला कधी कधी काही गोष्टीचं भान राहत नाही आणि त्यामुळे त्याच्या जीवावर हे एखादा सीन बेतू शकतो. असच काहीसं झालाय असंख्य चाहत्यांची जान असलेल्या भाईजान सोबत. अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या टायगर ३ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. आणि याच शूटिंग दरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसतंय या संदर्भात एक फोटो पोस्ट करत त्याने माहिती दिली आहे.(Salman Khan Injured)
सलमान ने त्याच्या ट्विटर हॅन्डल वरून एक फोटो पोस्ट केला आहे ज्या फोटो मध्ये त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याचं दिसतंय. या फोटोला त्याने कॅप्शन देत सलमान म्हणाला आहे कि ‘ज्यावेळी तुम्हाला वाटत संपूर्ण जगाचा भार तुमच्या खांद्यावर आहे तेव्हा जगाला सोडा आणि ५ किलोचे डंबेल्स उचला. टायगर जखमी है!सलमानच्या या पोस्ट वर चाहत्यांनी त्याला काळजी घेण्यास सांगितलं आहे. तर काहीजण सलमान ठीक व्हावा यासाठी प्रार्थना करतायत.

सलमान खान अभिनित एक था टायगर हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरला. त्या नंतर टायगर जिंदा है या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली या चित्रपटाच्या जेमतेम कमाईनंतर तब्बल ११ वर्षानंरत टायगर या च तिसरा भाग ‘ टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान सोबत पुन्हा एकदा अभिनेत्री कटरिना कैफ़ दिसणार आहे आणि सोबतच अभिनेता इमरान हाशमी देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(Salman Khan Injured)