वादाच्या भोवऱ्यात अनेक चित्रपट नेहमीच अडकत असतात. पण तरीही ते चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास यशस्वी ठरतात. सध्याच्या घडीला असाच एक चित्रपट जो वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरीही बॉक्स ऑफिस वर त्या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे तो चित्रपट म्हणजे द केरल स्टोरी. केरळ प्रांतातील महिलांना अतिरेकी संघटनांमध्ये जबरदस्ती समाविष्ट करणाऱ्या सत्य घटनेवर आधारित ही कथा आहे असं सांगण्यात आलं आणि वादाला सुरुवात झाली.(Sudipto Sen the kerla story)
पण याच वादावर आता बंदी घालण्यासाठी चित्रपटाचे दिगदर्शक आणि निर्मात्यांनी सत्य घटनेत या संकटाना सामोरे गेलेल्या स्त्रियांना लोकांसमोर आणले. सोबतच चित्रपटाचे दिगदर्शक सुदीप्तो सेन यांनी आणखी काही दवे केले आहेत त्यामुळे आता प्रशासनावर प्रश्न चिन्ह उभं केलं जाऊ शकत. मुंबईमधील प्रेस कॉन्फरन्स मध्ये द केरल स्टोरीचे दिगदर्शक सुदिप्तो सेन यांनी केरळ आणि मंगरूळ हे दोन दहशवादाचे मुख्य क्षेत्र आहेत असा दावा केला आहे.
मुंबई मधील प्रेस कॉन्फेरंसन्सला चित्रपटातील कलाकार, निर्माते , दिगदर्शक, यांच्या सोबतच पीडित महिला देखील उपस्थति होत्या.(Sudipto Sen the kerla story)