रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पोलिस आले, होणारे सासू-सासरे बघून पळून गेले अन्…; कंगना रणौतने सांगितली ‘ती’ घटना, म्हणाली, “पोलिस घरी येताच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 3, 2024 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kangana Ranaut On Wedding incident

कलाकार म्हणून आयुष्यात नुकसान झाल्याबाबत कंगना रनौतचं भाष्य

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कंगनाने आजवर अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी सज्ज झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री, खासदार कंगना रनौत सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र, आता या चित्रपटाचे प्रदर्शन धोक्यात आल्याचे दिसत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने ‘आप की अदालत’ या शोमध्ये सहभाग घेतला, जिथे तिने तिच्या लग्नासाठी आगामी नातेसंबंधांबद्दल आश्चर्यकारक खुलासा केला. (Kangana Ranaut On Wedding)

या शोमध्ये कंगनाने सांगितले की तिला योग्य जोडीदार सापडत नाही आहे त्यामुळे लग्न करण्यास विलंब होत आहे. अभिनेत्रीने सांगितले की, “जेव्हा तिच्या भावी सासरच्या लोकांना कळले की पोलिसांनी तिला बोलावले आहे, तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. यानंतर कंगनाने ती मस्करी करत असल्याचे स्पष्ट केले”.

आणखी वाचा – “तिने माफी मागूनही…”, भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बसू न दिल्याने अभिनेत्रीची जाऊबाई भडकली, म्हणाली, “शिक्षा भोगली पण…”

शोमधील कोणीतरी तिला लग्नाबद्दलचे विचार विचारले असता अभिनेत्रीने अतिशय सुंदर उत्तर दिले. कंगना म्हणाली, “हे बघ, माझ्या मनात लग्नाबद्दल खूप चांगले विचार आहेत. मला वाटतं की मला मुलं झाली पाहिजेत, पण आता लोकांनी मला इतका राग दिला आहे की ते मला लग्न करु देत नाहीत”. ‘आप की अदालत’ या शोमध्ये कंगनाने तिच्यावर अनेक कोर्ट केसेस असल्याचेही उघड केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केलेल्या टिप्पण्या, जावेद अख्तर यांच्याशी झालेल्या वादाबाबत केलेल्या टिप्पण्यांसह काही बाबींवर त्यांच्यावर न्यायालयीन खटले सुरु असल्याचं तिने सांगितलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तू अक्कल शून्य”, जान्हवी-छोटा पुढारीमधील वाद विकोपाला, सतत अभिनेत्रीला चल निघ म्हणत राहिला पण…; चूक कोणाची?

या प्रकरणी अभिनेत्री म्हणाली, “माझ्याकडे इतके कोर्ट केसेस आहेत की जेव्हाही मी कोणाशी बोलू लागते तेव्हा पोलिस माझ्या घरी येतात आणि समन्स येतात. एकदा माझे भावी सासरची मंडळी माझ्या घरी आले होते आणि त्याचवेळी मला समन्स आला ते पाहून ते पळून गेले. आणि हे एक कलाकार असण्याचे नुकसान आहे”, असेही कंगना म्हणाली.

Tags: bollywood actresskangana ranautKangana Ranaut On Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
ameya hunaswadkar health

आजारपणात चालताही येईना, चुकीचे उपचार अन्…; ‘बाबा लगीन’ फेम अभिनेता इतके वर्ष कुठे होता?, म्हणाला, “आई-वडिलांनाही गमावलं…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.