रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिने माफी मागूनही…”, भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बसू न दिल्याने अभिनेत्रीची जाऊबाई भडकली, म्हणाली, “शिक्षा भोगली पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 3, 2024 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 jahnavi killekar family

'बिग बॉस मराठी'मधील अन्यायाबाबत जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईची व्हायरल पोस्ट

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चर्चेत असलेल्या स्पर्धकांमध्ये दोन नाव अग्रगण्य आहेत ते म्हणजे निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर. निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. दोघींमधील मैत्रीचा बॉण्डही पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाला. निक्की जशी वागेल तसं जान्हवीही वागू लागली. मात्र भाऊच्या धक्क्यावर निक्कीने टीम A मधून एक्झिट घेतली आणि जान्हवी विरोधात खेळ खेळू लागली.

जान्हवीनेही मराठीतील दिग्गज कलाकार मंडळींचा अपमान केला. यावरुन रितेश देशमुखने जान्हवीची चांगली शाळा घेतली. काही दिवसांपूर्वी जान्हवीने पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे यांच्या अभिनय कारकीर्दीवरुन केलेलं भाष्य अनेकांना खटकलं. साऱ्या महाराष्ट्रातून जान्हवीला ट्रोल करण्यात आलं आणि त्यानंतर रितेश देशमुखने तिला आठवडाभर जेलमध्ये बंद केले. यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात अरबाजने टास्क दरम्यान आदळआपट केली, त्यावरुन भाऊच्या धक्क्यावर शाळा न घेता उलट त्याच कौतुक केलं हा अन्याय आहे म्हणत जान्हवीच्या जावेने म्हणजेच संध्या किल्लेकर यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझी थोडी तरी लाज शिल्लक आहे का?”, जान्हवीला मर्यादा ओलांडून बोलला छोटा पुढारी, तरीही तिच्यासमोरच बसून राहिला अन्…

View this post on Instagram

A post shared by Sandhya Vaibhav Killekar (@sandhya_killekar)

जान्हवीच्या जावेने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा देत तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “घरातील वस्तुंची आदळाआपट करुन ‘बिग बॉस’च्या घराचे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे. टास्कमध्ये आक्रमकता दाखवून शारीरिक हिंसा होण्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे. घरातीलच एका सदस्याला शिवीगाळ केल्यानंतर Bip Bip ऐकु येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा पण साधी चर्चाही नाही पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे. जान्हवीने केलेल्या चुका तिने मान्य करुनही घरातील प्रेक्षकांची मनापासून माफी मागूनही, प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगुनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही. हे जान्हवीसाठी खरंच खूप अन्यायकारक आहे. घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे”.

आणखी वाचा – गणपतीचे दिवस जवळ येताच रडू लागली अंकिता वालावलकर, ‘बिग बॉस’ने समजावलं, म्हणाली, “माझ्याशिवाय कसं होईल?…”

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “एक आठवडा शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान मिळालं नाही पण तुझ्या खंबीर, खऱ्या, स्वतंत्र खेळाने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा जागा मिळव. आमचा नेहमीच तुला पाठिंबा आहे. जान्हवी समर्थक”. सदर पोस्टखाली जान्हवीच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिला पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5jahnavi killekar family
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Paddy aka Pandharinath Kamble and Abhijeet Sawant explain gameplan to Suraj Chavan

Bigg Boss Marathi : "मी बेकार गेम खेळणार", अभिजीत-पॅडीला सूरजने स्पष्टच सांगतिलं, दोघंही समजूत काढत म्हणाले, "दहा वेळा विचार करुन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.