बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला होता. २०२० साली सुशांतने राहत्या घरी गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचेही अनेकांनी अंदाज बांधले गेले. या प्रकरणामध्ये अनेक कलाकार तसेच इतर व्यक्तींची नावंदेखील समोर आली होती. त्यातील एक नाव म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया ही सुशांतची गर्लफ्रेंड होती. त्यामुळे तिच्याकडे संशयाची सुई वळली होती. त्यानंतर तिला अभिनेत्याला अमली पदार्थ पुरवल्याप्रकरणी शिक्षा सुनावली होती. (rhea chakraborty on jail)
सुशांतच्या निधनानंतर रिया व तिच्या भावाला दीर्घ कालावधीपर्यंत तुरुंगात राहावे लागले होते. नुकतीच तिने एक मुलाखत दिली. यामध्ये तिने तुरुंगातील दिवस कसे होते? याबद्दल सांगितले आहे. जेव्हा ती तुरुंगात होती तेव्हा रोज मित्र व कुटुंबियांबरोबर दारु प्यायचे अशा सर्वत्र चर्चा केल्या जात असत. जेव्हा हे रियाला समजले तेव्हा ती भडकली होती. यावेळी तिने बोलताना सांगितले की, “तुरुंगात असतानाच समजले की खरे मित्र कोण आहेत?”.
रियाने नुकतीच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला मुलाखत दिली. यावेळी तिने तुरुंगातील वाईट दिवसांबद्दल सांगितले. ती म्हणाली की, “माझ्या वाईट काळामध्ये माझ्या मित्रांनी मला खूप साथ दिली. जेव्हा मी तुरुंगात होते तेव्हा त्यांनी माझ्या आई-वडिलांची खूप काळजी घेतली. माझे मित्र माझ्या घरी जायचे. माझ्या आई-वडिलांबरोबर जेवायचे व दारु प्यायचे”.
पुढे ती म्हणाली की, “मी जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांना मी एकच प्रश्न विचारला की तुमचे इतके वजन कसं काय वाढलं? मी माझ्या मित्रांना म्हंटलं की मी तुरुंगात होते आणि तुम्ही इथे जेवण जेवताय. वजन वाढवत आहात. तेव्हा मित्र म्हणायचे की, आई-वडिलांना खाऊ-पिऊ घालताना आम्हीदेखील खायचो-प्यायचो”.
यावेळी तिने तुरुंगात काय अनुभव आले? हेदेखील सांगितले आहे. ती म्हणाली की, “ते खूप विचित्र दिवस होते. आम्ही खुश होतो पण कोलमडले होतो. आम्ही खूप घाबरलेलो. माझा भाऊ फक्त २४ वर्षांचा होता आणि या वयात त्याला तुरुंगात जावे लागले. त्याचे CAT मध्ये ९६ टक्के आले होते. त्याला IIM मध्ये प्रवेश मिळाला होता. तो तीन महिने तुरुंगात होता. आम्ही दोघंही खूप खचलो होतो. पण आता आम्ही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत”. सध्या रिया चित्रपटसृष्टीपासून लांब असलेली पाहायला मिळत आहे.