शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “मला अरबाजविषयी विचारणं…”, अरबाजच्या गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “मला मॅसेज करुन…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 2, 2024 | 1:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Arbaaz patel girlfriend Leeza Bindra shared and said to netizens do not ask about him

Bigg Boss Marathi 5 मधील अरबाजबद्दल मला काही विचारु नका, कथित गर्लफ्रेंडने नेटकऱ्यांना स्पष्टच सांगितलं

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सुरु झाल्यापासून हा शो कोणत्या ना कोणत्या  करणाने चर्चेत आहे. या घरात दर आठवड्याला नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सगळे सदस्य आपला खेळ दाखवू लागले आहेत. तर, दुसरीकडे खेळाशिवाय घरातील सदस्य अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्की तांबोळी यांचे पहिल्या दिवसांपासून सूत जुळलं असल्याची चर्चा सुरू आहे. अरबाज पटेल हा आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. त्याचं खेळणं असो किंवा त्याचा राग असो. किंवा  यापलिकडे त्याचं निक्कीबरोबरचे संबंध असो. कोणत्या ना कोणत्या कारणाने अरबाज कायम चर्चेत आहे. अशातच आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण त्याच्या गर्लफ्रेंडच्या पोस्टमुळे… (Bigg Boss Marathi 5 Leeza Bindra Post)

‘बिग बॉस मराठी’ सुरू झाल्यापासूनच अरबाज व निक्कीमध्ये जवळीक पाहायला मिळालेली. केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर घरातील सदस्यांना देखील ती जाणवलेली. निक्कीचा विषय आला की, अरबाज नेहमीच हळवा होतो. किंवा तिच्यासाठी अगदी जीव तोडून खेळतो. जेव्हा त्याला नात्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने आपण कमिटेड असल्याचं सांगितलं. अशातच आता त्याची गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी लीझा बिंद्राने अरबाजशी संबंधित पोस्ट शेअर केली आहे.

लीझा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोअर्सही आहेत. अशातच लीझाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने अरबाजचा उल्लेख करत एक विनंती केली आहे. लीझाने स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे, त्यावर तिने लिहिलं आहे की, “कृपया मला अरबाजबद्दल मॅसेज किंवा कमेंट करु नका”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “गद्दार, खेळाचा समज नाही अन्…”, एकमेकांना सदस्यांनी केलं नॉमिनेट, डीपीवर छोटी पुढारी भडकला आणि…

अरबाज ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यावर लीझाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवर चाहते अरबाज व निक्की यांचा उल्लेख करत कमेंट्स करायचे. यापैकी नेटकऱ्यांच्या काही कमेंट्सना लीझा उत्तरंदेखील द्यायची. पण आता अरबाजसंदर्भात मला मॅसेज किंवा कमेंट करु नका असं म्हटलं आहे. त्यामुळे आता निक्कीमुळे अरबाज व लीझाचा यांकया नात्यात काही दुरावा येणार का? की ते त्यांचं नातं संपवणार? अशा चर्चा होत आहेत.  

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आर्याला शून्य किंमत आणि…”, अभिजीत-अंकिताची आर्याविरोधात खेळी, म्हणाला, “तिला भावच देणं बंद…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या मागील आठवड्यात जोडीचा मामला होता. ‘बिग बॉस’ने घरात जोड्या पाडल्या होत्या. निक्की आणि अभिजीतची एक जोडी होती. दोन जणांना 10 सदस्य टार्गेट करताना दिसून आले. अरबाजने निक्कीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि दुष्मन का दुष्मन दोस्त म्हणत अरबाज सर्वांनाच आवडू लागला. 

Tags: arbaaz patel girlfriendArbaaz patel girlfriend Leeza Bindrabigg boss marathi 5Leeza Bindra
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
myra vaikul viral video

घरातील नव्या पाहुण्यासाठी मायरा वायकुळ उत्सुक, आईच्या प्रेग्नन्सी फोटोशूटमध्ये धमाल अन्…; व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.