रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “आर्याला शून्य किंमत आणि…”, अभिजीत-अंकिताची आर्याविरोधात खेळी, म्हणाला, “तिला भावच देणं बंद…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 2, 2024 | 12:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Abhijeet Sawant tells to Ankita Walawalkar and Dhananjay Powar that he will not entertain Aarya Jadhav.

Bigg Boss Marathi 5 च्या घरात अभिजीत आर्याबद्दल करतोय प्लॅनिंग, तिला भाव न देण्याबद्दल अंकिता-धनंजयशी संवाद

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेला आठवडा फारच रोमांचक ठरला. या आठवड्यात बरीच समीकरणं नव्याने जुळताना पाहायला मिळालं. तर जुळलेली समीकरणं तुटल्याचे देखील पाहायला मिळाले. अशातच भाऊचा धक्काही फार मजेशीर झाला. ‘भाऊचा धक्का’ सुरु झाल्यानंतर बिग बॉसने जोडीमध्ये लावलेले बेल्ट रितेश सोडण्याचे आदेश देतो. याशिवाय घन:श्याम दरवडेशी रितेशने धरलेला अबोलाही सोडला. मग रितेशने शॉकचा टास्क खेळला, त्याचबरोबर सर्व जोड्यांचे डान्सही बघितले. त्यानंतर स्पर्धकांचे सोशल मीडियावर व्हायरल मिम्सही दाखवले. त्यानंतर रितेशने सर्वांना मोठा धक्का दिला तो म्हणजे अंकिताच्या एलिमिनेशनचा. अंकिताचं एव्हिक्शन हे सर्वांसाठी धक्कादायक होतं. मात्र ती एक गंमत असल्याचेही रितेश नंतर सांगतो. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

गेल्या काही दिवसांपासून आर्या व अभिजीत यांचे मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. मागे एकदा एका टास्कमध्ये आर्याने अभिजीतच्या पायला दुखापत झालेली असताना ही त्याच्याऐवजी टास्क खेळला. त्यामुळे बी टीममध्ये तिच्याबद्दल नाराजी पाहायला मिळाली. त्याचमुळे अभिजीतने कधीही तिच्याबद्दल आत्मीयता दाखवली नाही आणि त्याचा त्याचा आर्याविषयीचा नाराजीच्या सुर आजच्या भागातही पाहायला मिळणार आहे. याबद्दल तो ‘टीम बी’मधील अंकिता व धनंजयबरोबर गॉसिप करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – वैभव मांगलेंच्या लेकीने पहिल्यांदाचं बनवला संपूर्ण स्वयंपाक, अभिमानाने म्हणाले, “लवकरच माझा मुलगाही…”

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अभिजीत, अंकिता व धनंजय एकत्र बसलेले असतात. तेव्हा अभिजीत त्या दोघांना आर्याबद्दल असं म्हणतो की, “मी आर्याला फार entertain करत बसणार नाही. तिला आपण उगाच भाव देत आहोत, ज्याचा काही अर्थच नाही. ग्रुपमध्ये तिची काय किंमत होती हे सर्वांनाच माहीत आहे. ती मला बोलते की, पण ती स्वत: काय आहे हे तिने बघितलं पाहिजे. तिची किंमत कमी होती तेव्हा मी बोललो की, बाबा तिला किंमत द्या. तिचं म्हणणं पण ऐका. ही गोष्ट मी तिला बोललो आणि ती आज मला बोलतेय की, मी तिला किंमत देत नाहीये”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज-जान्हवीने केली निक्की-अरबाजची नक्कल, डीपीनेही दिली साथ, इतर स्पर्धकांना हसू अनावर

यापुढे अंकिताही तिच्याबद्दल असं म्हणते की, “आम्हीही  तिला entertain करत नाही. मी स्वत: तिला बोलली आहे की, जिथपर्यंत मी तुला समजावतेय तिथपर्यंत मी तुला समजवणार. त्याच्यापुढे समजावणार नाही आणि याबद्दल मी तिला अनेकदा बोललीदेखील आहे”. त्यामुळे आता या घरात आर्याविरुद्ध अभिजीत, अंकिता यांचा सामना पाहायला मिळणार असल्याचे दिसून येत आहे.   

Tags: abhijeet sawantankita walawalkarbigg boss marathi 5dhananjay powar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Arbaaz patel girlfriend Leeza Bindra shared and said to netizens do not ask about him

Bigg Boss Marathi : “मला अरबाजविषयी विचारणं…”, अरबाजच्या गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “मला मॅसेज करुन…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.