रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांना पॅनिक अटॅक येतो आणि…”, जया बच्चन यांच्यावर कंगना रणौतची सडकून टीका, म्हणाली, “लाजिरवाणी गोष्ट की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 2, 2024 | 11:22 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
kangana ranaut on jaya bachchan

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या आहेत. मात्र सध्या अभिनय सोडून तिने राजकारणात प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या विभागातून ती निवडून आली आहे. त्यानंतरदेखील ती मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली आहे. सध्या ती आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’मुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. (kangana ranaut on jaya bachchan)

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका या चित्रपटात  कंगनाने साकारली आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दृश्य या चित्रपटात दाखवू नयेत अशी मागणीदेखील केली जात आहे. याबाबतचा तिचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. कंगनाने आता जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज-जान्हवीने केली निक्की-अरबाजची नक्कल, डीपीनेही दिली साथ, इतर स्पर्धकांना हसू अनावर

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

काही दिवसांपूर्वी जया या संसदेमध्ये केलेल्या एका व्यक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या. पती अमिताभ बच्चन यांचे नाव त्यांच्या नावाबरोबर जोडले गेले होते. त्यांचे नाव जया अमिताभ बच्चन असे घेतल्याने खूप निराश झाल्या आणि रागामध्ये खूप काही बोलून गेल्या. मात्र त्यानंतर अमिताभ यांचे नाव घेऊन त्यांच्यावर गर्व असल्याचेदेखील सांगितले. त्यावर आता कंगना भाष्य करताना दिसली आहे.

आणखी वाचा वैभव मांगलेंच्या लेकीने पहिल्यांदाचं बनवला संपूर्ण स्वयंपाक, अभिमानाने म्हणाले, “लवकरच माझा मुलगाही…”

कंगनाने ‘फिव्हर FM’ला मुलाखत दिली. यामध्ये तिने जया यांच्याबद्दल बोलताना म्हणाली की, “ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. निसर्गाने पुरुष व महिलांना वेगवेगळे बनवलं आहे. पण आजकाल स्त्रीवादाच्याच्या नावावर महिला काहीही बोलतात. आपला समाज घमंडी होत चालला आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. लोकांना वाटत की आपली ओळख हरवली आहे. जया यांना मध्येच पॅनिक अटॅक येतो. लोक खूप घाबरले आहेत आणि हे खूप चुकीचे आहे”.

दरम्यान कंगनाने जया यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. मात्र जया यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.    

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Navya naveli nanda IIM

अहमदाबादमध्ये शिक्षणासाठी गेली अमिताभ बच्चन यांची नात, नेटकरी म्हणाले, “कौतुकच आहे पण इथे…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.