रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : अखेर आदित्यला प्रिया-प्रीतमच नातं मान्य, पारूबरोबर मिळून शिकवणार दिशाला धडा, अहिल्यादेवींसमोर आणणार खरा चेहरा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 30, 2024 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Marathi Serial todays episode

पारू मालिकेत आदित्यने प्रिया-प्रीतमच्या नात्याला दिला पाठिंबा

Paaru Marathi Serial Update :  ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, तिकडे पारू किचनमध्ये काम करत असते. तर दिशाच्या काही मैत्रिणी येणार म्हणून ती खूपच खुश असते आणि शिवाय तिला तिच्या सासरच घर तिच्या मैत्रिणींना दाखवायचं असतं असं ती अहिल्या देवींना सांगते. तर प्रीतम व आदित्य ऑफिसला जात असतात तेव्हा दिशा मुद्दाम अहिल्या देवींसमोर प्रीतमला तू घरीच थांब ना मला माझ्या मैत्रिणींशी तुझी भेट घडवायची आहे असं सांगते. यावर प्रीतमही होकार देत हो चांगला मुलगा नाही तर चांगला नवरा तरी होतो असं टोमणा देत घरीच राहायचं ठरवतो.

त्यानंतर आदित्य व अहिल्यादेवी ऑफिसला निघून जातात. त्यानंतर दिशा प्रीतमला स्वतःच्या तालावर नाचवते. त्याला उठायला, बसायला सतत सांगत असते आणि प्रीतम ही तिच्या मनासारखाच वागत असतो. तर इकडे पारू किचनमध्ये काम करताना ती प्रियाला फोन लावते आणि तुम्ही कशा आहात अशी चौकशी करते. तेव्हा प्रियाकडून कळतं की, ती आज पाच वाजताच्या गाडीने कायमची गावाकडे निघून जाणार आहे. तिला तिच्या आबांनी गावी बोलावलं असल्यास ती सांगते आणि प्रीतम बद्दलची काळजी ही ती व्यक्त करते. तर इकडे आदित्य व पारू एकमेकांशी प्रीतमबद्दल बोलतात. आदित्यला प्रीतम व प्रियाचं नातं मान्य नसतं त्याबद्दल आदित्य पारुला विचारतो की, दिशा ही योग्य मुलगी आहे की नाही? आणि प्रीतम बरोबर तिचं लग्न व्हावं की नाही?, मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : बाईईई हा काय प्रकार?, आदळआपट, भांडणानंतर निक्की-अरबाजमध्ये फुललं प्रेम, घट्ट मिठी मारली, मध्यरात्री जवळ गेला अन्…

यावर पारू उत्तर देत म्हणते की, खरं मनातलं सांगायचं तर जोड्या या स्वर्गातच जुळलेल्या असतात आपण फक्त प्रयत्न करायचे तुम्ही असेच प्रयत्न करत आहात. आता देवाच्या मनात काय आहे ते नाही माहित पण प्रीतम सरांचं जर दिशा मॅडम बरोबर लग्न झालं तर ते सुखी राहू शकत नाही. हे एकच वाक्य आदित्यला खटकतं आणि आदित्य ऑफिस मधून पुन्हा घरी येतो कारण त्याला शंका असते की दिशा तिच्या मैत्रिणींसमोर प्रीतमची लाज काढेल. दिशाच्या मैत्रिणी आल्यानंतर दिशा त्यांच्या खांद्यावरील पर्सेस प्रीतमच्या गळ्यात लटकवते आणि प्रीतमला पाणी द्यायला सांगते. हे सगळं काही आदित्य बाहेरुन बघत असतो. तर पारूलाही हे काही पाहवत नाही. त्यानंतर पारू बाहेर येते. तर तिला आदित्य दिसतो. आदित्य म्हणतो की, आता हे खूप अति झालं. तरी मला वाटलंच होतं की, ही दिशा काहीतरी करेल. माझ्या मनाला तू दिलेलं मत खात होतं म्हणून मी ऑफिसमधून तडक निघून आलो. त्यानंतर पारू आदित्यला थांबवते आणि सांगते की, आता नाही आता ही वेळ नाहीये. देवीआईसमोर दिशाचा खरा चेहरा आणण्याची. त्यामुळे आपल्याला इथेच थांबाव लागेल. आणि सांगते की, प्रिया मॅडम कायमच्या गावी निघून चालल्या आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : जेलमध्ये टाकूनही बोलणं, माज तोच आणि…; मराठी अभिनेत्रीने घेतला जान्हवीचा समाचार, म्हणाली, “आता निक्कीला बोलते…”

आता तरी तुम्ही प्रिया व प्रीतम यांचं प्रेम मान्य करा. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य पारू व प्रीतमसह प्रियाला भेटायला जातो आणि सांगतो की, मला तुमचं लग्न मान्य आहे. तुम्ही दोघं लग्न करू शकता. तू माझ्या भावाशी लग्न करशील का? असं म्हणत प्रियाला मागणी घालतो. यावर प्रिया दूर जात सांगते की, पण हे लग्न होऊ शकत नाही. माझे आबा या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत. आता मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serialpaaru marathi serial uodate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
kapil sharma new post

"याच्याकडे एवढे पैसे आले कुठून?", Private Jet मधून कपिल शर्माचा बायकोसह प्रवास पाहून चाहत्यांचा प्रश्न, म्हणाले, "फक्त कॉमेडी करुन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.