गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : प्रीतम-प्रियाचं प्रेम आदित्यला अमान्य, पारू समजूत काढू शकेल का?, पाहणं ठरणार रंजक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 28, 2024 | 10:24 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial  Update todays episode update

पारू दिशाला अद्दल शिकवणार, तर प्रिया-प्रीतमच्या प्रेमाचा आदित्य कसा स्वीकार करणार हे पाहणं ठरणार रंजक

Paaru Serial  Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रीतम विचार करत असतो की, काल जे काही झालं ते चुकीचं झालं. शिवाय प्रिया मॅडम ही मला कायमच्या सोडून गेल्या. मी त्यांच्याशिवाय जगण्याचा विचारही करु शकत नाही तर इकडे प्रिया प्रीतमला भेटायला म्हणून आलेली असते तेव्हा ती चोरवाटेने बंगल्यात शिरते. बंगलातल्या सुरक्षारक्षकांना कोणीतरी आत घुसल्याचा भास होतो आणि ते चोर चोर म्हणून ओरडू लागतात. त्यानंतर घरातील सगळीच मंडळी बाहेर येतात आणि विचारतात की, कोण आत मध्ये आल आहे. यावर सुरक्षारक्षक सांगतात की, कोणीतरी आत आलं याचा मला भास झाला. तेव्हा श्रीकांत सांगतात की तुम्हाला भास झाला असेल कोणीच नसेल किंवा आपल्या आवाजाने तो चोर पळूनही गेला असेल.

त्यानंतर श्रीकांत सगळ्यांना बोलतात की आपण आतमध्ये जाऊया आणि आदित्यला सांगतात तुला सुरक्षारक्षक वाढवायचे असतील तर वाढवून घे. यावर आदित्य होकार देतो. त्यानंतर सगळेच जात असतात तेव्हा पारू सुद्धा त्या आवाजाने आलेली असते तेव्हा आदित्य पारुला हाक देत सर्व ठीक आहे ना असं म्हणतो. आणि त्यानंतर दोघेही आपापल्या वाटेला जातात. पारू मागे येते आणि बघते तर प्रिया मॅडम खाली बसलेल्या तिला दिसतात. त्या प्रिया जवळ जातात आणि विचारतात तुम्ही इथं काय करताय तेव्हा ती सांगते की, काल जे काही झालं ते व्हायला नको होतं. मला काही करुन प्रीतम सरांना शेवटचा भेटायचे आहे. कारण मी आता कायमची गावी जाणार आहे हे ऐकल्यावर पारूला टेन्शन येतं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात नात्यांची समीकरणे बदलणार, कोणाला मिळणार प्रेमात ठोकर आणि कोणाला होणार पश्चात्ताप?

त्यानंतर पारू चोरीने प्रियाला बंगल्यात घेऊन येते तर इकडे प्रीतम प्रियाच्याच विचारत असतो आणि त्याला प्रिया समोर दिसते. मात्र त्याला असं वाटतं की, ही प्रिया नसून भास आहे. त्यानंतर थोड्या वेळाने तिथे पारू सुद्धा येते तेव्हा पारूला विचारतो, तू सुद्धा भास आहेस का?, तेव्हा प्रीतमला पारू सांगते नाही मी खरीच पारू आहे. आणि प्रिया सुद्धा खरी असल्याचा त्याला नंतर कळतं. त्यानंतर तो गुडघ्यावर बसून प्रियाला प्रपोज करतो. प्रिया विचारते की, पण तुमच्या सिगारेट दारूच काय?, यावर प्रीतम सांगतो की, मी सगळं काही सोडलं आहे. मला तुमच्या बरोबर राहायचं आहे त्यासाठी मी काहीही सोडायला तयार आहे. इतक्यात दरवाज्यात आदित्य येतो आणि विचारतो की, मला आणि आईला सुद्धा सोडशील का?, हे ऐकल्यावर सगळेच जण आदित्यकडे पाहत शॉक होतात. त्यानंतर आदित्य प्रीतमवर खूप संताप करतो आणि पारूवरही ओरडतो. आदित्यला कळतच नाही की, नेमकं हे काय होत आहे. त्यानंतर आदित्य प्रीतम समोर दोन पर्याय ठेवतो की एक तर तू हिला घेऊन आत्ताच्या आत्ता घराबाहेर पड किंवा आईनं सांगितलेल्या मुलीशी म्हणजे दिशा बरोबर तू लग्नाला तयार हो, हे दोनच पर्याय तुझ्याकडे आहेत तेव्हा प्रीतम निर्णय घेतो आणि म्हणतो की आता हा आपल्या दोघांमधला सवाल आहे. असं म्हणत प्रियाच्या हाताला धरतो आणि बाहेर निघून जातो. तर पारू आदित्यला खूप समजावण्याचा प्रयत्न करते.

आणखी वाचा – Suhasini Deshpande Death : मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

आता आदित्य पारुच्या सांगण्यावरुन शांत होईल का?, प्रीतमला तो समजून घेईल का हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरेल. तर मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, किचनमध्ये सावित्री व पारू बोलत असतात तेव्हा सावित्री म्हणते की, अहिल्यादेवींनी हाताला धरुन तिला बाहेर काढायला पाहिजे, हे दिशा ऐकते आणि म्हणते तुम्ही माझ्याबद्दलच बोलत आहात ना?, तुझी हिम्मत कशी झाली माझ्याबद्दल बोलायची असं म्हणून ती सावित्रीवर हात उगारते. तितक्यात पारू दिशाचा हात धरते. आता पारू दिशाला अद्दल घडवणार का?, हे सारं पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serial.Paaru Serial  Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 arbaaz patel

Bigg Boss Marathi च्या घरात तोडफोड करणं अरबाज पटेलला पडलं महागात, मिळाली मोठी शिक्षा, निक्कीच्या वागण्याचा फटका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.